चोरीप्रकरणी फोंड्यात महिलेस अटक

६.१५ लाखांचे सोने व ३८ हजार रुपये रोख केले होते लंपास.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : घरात प्रवेश करून चोरी केल्याप्रकरणी कुर्टी-फोंडा येथील रत्नमाला चंद्रशेखर ओगुरू (मूळ रा. आंध्रप्रदेश) या महिलेला फोंडा पोलिसांनी अटक केली. तिने कुर्टी येथील सुजिथा दर्सी यांच्या घरात प्रवेश करून ६.१५ लाखांचे सोने व ३८ हजार रुपये रोख लंपास केले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.