गुरांना वाचवण्याच्या नादात गेला जीव

गोव्यात रस्त्यावरील मोकाट गुरांचा उपद्रव दिवसेंदिवस मोठी चिंतेची बाब ठरत आहे. या गुरांमुळे लोकांचे जीव जाण्याच्या घटनात वाढ होत आहे.

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडा: गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मेलका मोलें येथे अपघातात सुभाष रामचंद्र खुटकर यांना मरण आले. 52 वर्षीय सुभाष खुटकर काजूमळ सांगोड येथील आहेत. त्यांचं घटनास्थळीच निधन झालं. रस्त्यावर बसलेल्या मोकाट गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली ते सापडले.

सुभाष खुटकर हे आपल्या दुचाकीने धारबांदोडा येथे रेशन नेण्यासाठी आले होते. रेशन घेऊन माघारी जाताना मेलका मोले येथे रस्त्यावरील गुरांना चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांचा दुचाकीवरील ताबा गेला. समोरून येणाऱ्या या ट्रकखाली ते चिरडले गेले.

कुळे पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला. या अपघात प्रकरणी ट्रक चालकाला अटक केलीय.कुळे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मोकाट गुरांचं करणार काय?
गोव्यात मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. राज्यातील सर्व ठिकाणी ही मोकाट गुरे पहायला मिळतात. या गुरांमुळे अपघात होण्याच्या घटनाही वाढल्याने ती चिंतेची बाब ठरत आहे. सरकारने या प्रश्वावर तोडगा काडण्याची मागणी लोकांकडून होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!