जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या ऑपरेटिंग बेसवर आत्मघातकी हल्ला…

तीन जवान शहीद, दोन अतिरेक्यांचा खात्मा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : जम्मू काश्मीर येथील लष्कराच्या एका तळावर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर येथील राजौरीमध्ये ही घटना घडली. राजौरीपासून 25 किलोमीटर दूर असलेल्या एका सैन्य दलाच्या ऑपरेटिंग बेसवर अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या मोहिमेत लष्कराच्या तीन जवानांना वीरमरण आले आहे.
हेही वाचा:Vice President of India : जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती…

अतिरेक्यांचा खात्मा करून हल्ल्याचा कट उधळला

लष्कराच्या एका तळावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अतिरेक्यांशी सुरक्षा दलांची चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे पाच जवान जखमी झाले आहेत. राजौरीपासून २५ किलोमीटर दूर दरहाल भागातील परहालमध्ये लष्कराची ही छावणी आहे. या छावणीच्या कुंपणांमधून घुसण्याचा दोन अतिरेकी प्रयत्न करत असल्याचे जवानांच्या लक्षात आले. त्यानंतर अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत अतिरेक्यांचा खात्मा करून लष्कराने आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला.
हेही वाचा:मतदान करून परतताना दाम्पत्यावर ‘काळाचा घाला’…

परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त

दरम्यान, या घटनेनंतर सहा किलोमीटरच्या क्षेत्रात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. जखमी जवानांवर लष्कराच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. १६ कोर्प्सचे लेफ्टनंट कमांडर जनरल मनजिंदर सिंग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा:Photo Story | सोहळा लोकशाहीचा, जागर मताधिकाराचा, पहा पंचायत निवडणूक मतदानातील ‘खास फोटो’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!