खैरीची अवैध तोड केल्याप्रकरणी एकास अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी
वेबडेस्क 8 जुलै : गोवा वनविभागाने आज 8 जुलै रोजी आरोपी सिकंदर चंद्रकांत मालवणकर, रा.तळवडे, सावंतवाडी, महाराष्ट्र यास स्थानिक लोकांच्या मदतीने सांगे तालुक्यातील एका गावातील 40 नग खैरीची अवैध तोड केल्याप्रकरणी अटक केली. तर इतर सात आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

आरोपी सिकंदर चंद्रकांत मालवणकर याच्यावर भारतीय वन कायदा 1927 च्या कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सांगेचे प्रथम श्रेणीतील न्यायदंडाधिकारी, यांनी 3 दिवसांची कोठडी दिली असून 10 जुलै 2023 रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

उपविभागीय वन अधिकारी श्री मिंगेल फर्नांडिस व उपविभागीय वन अधिकारी मिगेल फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी, विक्रमादित्य गावकर, परिक्षेत्र कार्यालय सांगेचे कर्मचारी वनसंरक्षक प्रेमकुमार आर IFS पुढील चौकशी करत आहेत.