कला अकादमीच्या इमारतीचा पुनर्निर्माणाधीन स्लॅब कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही

प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या कला अकादमीच्या इमारतीचा नूतनीकरणाखालील स्लॅब कोसळला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट 17 जुलै | पणजीत सरकारद्वारे चालवले जाणारे प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या कला अकादमीच्या इमारतीचा नूतनीकरणाखालील स्लॅब कोसळला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. रविवार-सोमवारच्या मध्यरात्री झालेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

कला अकादमीतील ओपन एअर ऑडिटोरियमच्या स्टेजचे छत कोसळले. त्यामुळे जुलै महिन्यातच नव्याने नूतनीकरण केलेल्या परिसराचे बहुप्रतिक्षित उद्घाटन रखडले आहे.विशेषत: या कामासाठी तब्बल 55 कोटी खर्च झाल्यामुळे नामांकित कला संस्थेच्या नूतनीकरणाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. 

सदर कोसळलेला स्लॅब हा ओपन एअर ऑडिटोरियमचा भाग होता जो नूतनीकरणाधीन होता, तसेच घटना घडली तेव्हा परिसरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ”आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे. आणि कोसळलेला स्लॅब हा सध्या नूतनीकरण केले जात असलेल्या मुख्य इमारतीचा भाग नाही.,तसेच आम्हाला जवाबदारीची जाणीव आहे, अहवाल आल्यानंतर कला अकादमीची इमारत नूतनीकरणाच्या कामामुळे दोन वर्षांहून अधिक काळ रिकामी आहे. कला अकादमीमध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) सह अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Kala Academy 'या' तारखेला होणार खुली; मंत्री गोविंद गावडे यांनी दिली माहिती

मागे एकदा विधानसभेतदेखील कला अकादमीच्या नूतणीकरणाचा मुद्दा बराच तापला होता. तेव्हा विजय सरदेसाई यांनी मंत्री गोविंद गावडे यांना कला अकादमीच्या नूतणीकरणाच्या टेंडरविषयी प्रश्नकरून घेरण्याचा प्रयत्न केला होता. उत्तर देताना मंत्री गावडे यांनी ‘शाहजहानने ताजमहाल बांधताना टेंडर काढले नव्हते काही असे मिश्किल उत्तर दिले होते. त्यावरूनही बराच गदारोळ माजला होता. आता हा जो स्लॅब कोसळला आहे त्याने कला अकादमीच्या एकंदरीत नूतणीकरणावर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहीलं आहे.

Kala Academy, Goa - A Well Built Unbuilding - archEstudy

एकंदरीत 56 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज असलेल्या, कला अकादमीच्या नूतनीकरणाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती, त्यानंतर गोवा सरकारने कला अकादमीचा कोणताही भाग पाडला जाणार नाही तर दुरुस्ती केली जाईल असे खंडपीठाला दिले होते.

कॉलेज ऑफ थिएटर आर्ट'वर ओढवली भरती मागे घेण्याची नामुष्की | Kala Academy Goa

प्रथितयश आर्किटेक्ट चार्ल्स कोरेय्या यांच्या कार्यावर आक्षेप नोंदवून, तसेच चार्ल्स कोरेय्या फाउंडेशनला नूतणीकरणाच्या एकंदरीत प्रक्रियेपासून दूर ठेवत गोविंद गावडे यांनी आधीच रोष ओढवून घेतलेला आहे. उद्या 18 जुलै पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, विरोधकांकडून हा मुद्दा उचलून धरला जाणार हे मात्र निश्चित. त्यातल्या त्यात मंत्री गोविंद गावडे आणि आमदार विजय सरदेसाई यांच्यात कला अकादमी वरुन जुगलबंदी रंगणार हे ठरलेलंच आहे. मात्र, यात मायबाप रसिकजन भरडला जातोय त्याचं काय?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!