इंटरनॅशनल सद्गुरु गुरुकुलम् शाळेला एमआरएफ द्वारे शैक्षणिक कार्यासाठी बस देण्यात आली

  •  सहकार्य.

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुंडई : संपूर्ण विश्वाला आज गरज आहे सनातन धर्माची. सनातन धर्म बंधुत्वाची व मानवतेची शिकवण देतो. सनातन हिंदू धर्माचे संस्कार शिक्षणातून प्राप्त होत असतात, आज संस्कारांचा लोप होत चाललेला पाहून शालेय स्तरावरून संस्कारांचे शिक्षण देणे आवश्यक आहे यासाठी इंटरनॅशनल सद्गुरु गुरुकुलम् शाळेची स्थापना करण्यात आली आहे, या शालेय विद्यार्थ्यांकरिता यातायात व्यवस्थेकरिता एमआरएफ कंपनीकडून बस पुरस्कृत केल्याबद्दल श्री दत्त पद्मनाभ पीठाचे अनंत आशीर्वाद असे पद्मश्री विभूषित, धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी आपल्या दिव्य मनोगतातून उद्बोधन केले.

Sadguru Dnyanpeeth | Ponda

पूज्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाने दर्जेदार शिक्षण व उत्तम संस्कार देवून देशाची भावी पीढी निर्माण करण्याच्या हेतूने श्री क्षेत्र तपोभूमी येथे ‘इंटरनॅशनल सद्गुरु गुरुकुलम्’ शाळा सुरु आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन यातायात व्यवस्थेकरिता एमआरएफ कंपनी तर्फे बस देण्यात आली. याप्रसंगी बसचे पूजन व उद्धाटन धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन सान्निध्यात व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते श्री क्षेत्र तपोभूमीवर करण्यात आले.

यावेळी एमआरएफ चे जनरल मॅनेजर गौतम राज, व्यंकटेश तळावलीकर – चौघुले इंडस्ट्रीजचे विक्री व्यवस्थापक, यूएनके (सुमेश कृष्णा) – संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष – पीपल्स लीगल वेल्फेअर फोरम – राष्ट्रीय सामाजिक-कायदेशीर संघटना, सत्गुरु फाउंडेशनच्या – अध्यक्षा ॲड्. ब्राह्मीदेवीजी, श्री दत्त पद्मनाभ पीठ – संचालिका निलिमा मांद्रेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले


तपोभूमीद्वारे सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची खरोखरच आज समाजाला गरज आहे. शैक्षणिक क्षेत्र हे उत्तम साधन सुविधांनी युक्त असण्याची आवश्यकता आहे याकरिता विद्यार्थ्यांच्या यातायात व्यवस्थेकरिता ही एमआरएफद्वारे बस पुरस्कृत करण्यात आली ही अत्यंत उल्लेखनीय गोष्ट आहे यासाठी पूजनीय स्वामीजींच्या शैक्षणिक उपक्रमांना अनंत शुभेच्छा देऊन व्यवस्थापनाचे अभिनंदन करतो असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या मनोगतात म्हटले.


गौतम राज – जनरल मॅनेजर एमआरएफ


पूजनीय स्वामीजींच्या दिव्य संकल्पनेतून साकारलेल्या शैक्षणिक कार्याची सर्वांना आवश्यकता आहे. खरोखरच हे कार्य उल्लेखनीय आहे या शैक्षणिक कार्याकरिता सहकार्य करता आले हे आमचे सौभाग्य समजतो याही पुढे या शैक्षणिक कार्यासाठी सहकार्य केले जाईल. असे एमआरएफ चे जनरल मॅनेजर गौतम राज यांनी आपल्या मनोगत म्हटले.

[ytplayer id=130385

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!