आर.जी.पी. आमदार विरेश बोरकर यांच्या नेतृत्वाने रक्तदान शिबिराचे आयोजन

भरपूर लोकांकडून या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला होता.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्यूरो रिपोर्ट : रेव्होलुशनरी गोवन्सचे सांत आंद्रेतील आमदार विरेश बोरकर हे आपल्या मतदारसंघात विविध स्तरावर कार्य बजावत असून, काल रविवारी गोवा वेल्हा इथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यावेळी भरपूर लोकांकडून या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला होता.

यादरम्यान आमदार विरेश बोरकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी रक्त दान करणाऱ्यापासून ते यशस्वीपणे ह्या आयोजनाला हातभार लावणाऱ्यांचे कौतुक केले आहे. रक्तदान ही काळाची गरज असून, रक्ता अभावी राज्यात अनेक लोकांचा जीव गेला आहे. प्रत्येक जबाबदार नागरिकांनी रक्तदान केले पाहिजे. आमच्याकडून यापुढेही अशा प्रकारची शिबिरे सुरूच राहणार असून प्रत्येकाने आपआपल्या परीने सहकार्य करून दुसऱ्यांचे जीवन वाचविण्यात आपले योगदान द्यावे अशी विनंती विरेश बोरकर यांनी यावेळी केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!