आपल्या जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी मी कटिबद्ध:- वीरेश बोरकर

Goan Varta Live | प्रतिनिधी
सांत आंद्रे मतदारसंघातील रेव्होलुशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यानी काल शनिवारी, जुवारी गावातील लोकांबरोबर पाण्याच्या प्रश्नावर जाहीर सभा बोलाविण्यात आली. या सभेला ग्रामस्थांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी मोठ्या संख्येत हजेरी लावली. यावेळी अनेकानी आपआपल्या अडचणी बोरकर यांच्या समोर मांडल्या.

वीरेश बोरकर यानी जनतेचा पाण्याचा प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय योजना आखण्यासाठी घेतलेल्या या सभेमध्ये समाधानकारक चर्चा झाली. त्याचबरोबर त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नळातून पाण्याचे वितरण होण्याची वेळ ठरविण्यात आली. अनेक गंजलेल्या अवस्थेत असलेल्या पाण्याच्या पाइप लाइन सुद्धा नवीन घालण्यात येणार असून, पुढेसुद्धा अशाप्रकारचा पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला, तर परत एकदा मोठ्या संख्येने पणजीतील सा. बां ख़ा. कार्यालयाबरोबर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालया समोर धरणा आंदोलन करू , असेही ते म्हणाले. आपल्या जनतेचा पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. पाण्याच्या विषयां अतिरिक्त आणखी काही अडचणी असल्यास आपल्याला कळविण्यात याव्या अशी विनंतीही बोरकर यानी जुवारी वासियाना केली .

या सभेमध्ये उपस्थित महिलांनी आमदार वीरेश बोरकर यांचे खूप कौतुक केले. बोरकर यानी गावांतील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे आज गावात घराघरात पाणी येण्याचे संकेत दिसत असून ही एक आनंदाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.
तब्बल वीस वर्षांनी जुवारी गावात पहिल्यांदाच एका आमदाराने पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून यापूर्वी लोक खासगी टँकरने पाणी आणत असत, तसेच आमदार फक्त निवडणुकीपूर्वी मते मागण्यांसाठी येत असत . निवडणूक संपल्यानंतर जनतेच्या प्रश्नाकडे ढुंकूनही बघत नसत, पण वीरेश बोरकर यानी निवडून येऊन आपल्या सांत आंद्रे मतदार संघात अनेक विकासकामे स्वताच्या उपस्थितीने करून घेतात आणि आज आपल्या जुवारी गावात सुद्धा त्यांनी इतकी वर्षे प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल ग्रामस्थांनी बोरकर यांचे आभार मानले.