आकाश बायजूज गोव्याचा विद्यार्थी आदित्यकुमार प्राजेश यास जेईई मेन्स २०२३ परिक्षेत ९९.०४ पर्सेन्टाइल

Goan Varta Live | प्रतिनिधी

आकाश बायजूज गोवाचा विद्यार्थी आदित्य कुमार प्राजेश याने जॉइंट एन्ट्र्न्स एक्झामिनेशन (जेईई) २०२३च्या पहिल्या फेरीमध्ये ९९.०४ पर्सेन्टाइल गुण प्राप्त केले आहेत. राष्ट्रीय परिक्षा यंत्रणेद्वारे नुकतेच या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा अभियांत्रिकी साठी होणाऱ्या दोन जेईई परिक्षांपैकी ही पहिली फेरी होती.
जगातील सर्वांत कठीण, अवघड अशी समजली जाणारी आयआयटी-जेईई या परिक्षेच्या तयारीसाठी आदित्यने आकाश बायजूज क्लासरूम प्रोग्रॅममध्ये प्रवेश घेतला होता. इन्स्टिट्यूटमध्ये पायाभूत संकल्पना सुलभपणे अवगत झाल्याने आणि अभ्यासाच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे या बाबींमुळे जेईईच्या टॉप पर्सेन्टाइल मिळवणाऱ्यांच्या यादीत आपल्याला स्थान मिळू शकले असे त्याने सांगितले. “या दोन्ही बाबींसाठी आकाश इन्स्टिट्यूटने आम्हाला सतत मार्गदर्शन केले. कमी कालावधीत एवढ्या अवघड, क्लिष्ट शास्त्रीय संकल्पना, सिद्धांत अवगत करणे आकाश इन्स्टिट्यूटमधील प्रशिक्षण व त्यांनी बनवलेला सुलभ अभ्यासक्रम याशिवाय आम्हाला शक्य झाले नसते,” असेही ते म्हणाला.

या कामगिरीबाबत आदित्यचे अभिनंदन करताना आकाश बायजूजचे विभागीय संचालक श्री. अमित सिंह राठोड म्हणाले, “या चमकदार कामिगीरीसाठी आम्ही आदित्यचे अभिनंदन करतो. जेईई मेन्स-२०२३ परिक्षेसाठी देशभरातून ८.६ लाख विद्यार्थी बसले होते. सातत्यपूर्ण परिश्रम आणि सर्वोत्तमतेचा ध्यास या बाबी आदित्यच्या या प्रवासात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. भविष्यात असेच यश मिळवण्यासाठी यानिमित्ताने त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा!”

विद्यार्थ्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळावी या उद्देशाने जेईई (मेन्स) ही परिक्षा दोन फेऱ्यांमध्ये आयोजित केली जाते. प्रमुख आयआयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी केवळ जेईई अॅडव्हान्स्ड ही परिक्षा ग्राह्य मानली जाते. तर विविध राष्ट्रीय तंत्र संस्था (एनआयटी) आणि विविध शासन अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स ही परिक्षा ग्राह्य मानली जाते. जेईई अॅडव्हान्स्डला पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स ही परिक्षा देणे आवश्यक ठरते.
आकाश बायजूजद्वारे माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून आयआयटी-जेईई परिक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले जाते. गत काही वर्षांत आकाशने संगणकाधारित प्रशिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. आयट्युटरद्वारे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुविधा उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांना स्वयंगतीने शिक्षण घेता येते तसेच एखादे लेक्चर करता आले नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आवश्यक माहिती पुन्हा पुन्हा घेता येते. मॉक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परिक्षेचा अनुभव दिला जातो, यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेदरम्यानच्या ताणतणावांची ओळख होऊन परिक्षा देण्याबाबतचा विश्वास वाढतो.