नोकरी शोधताय का? मग हे नक्की वाचा…

ऑईल इंडिया कंपनीने नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी एक खुशखबर आणली आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः देशात कोरोनाने नुसता धुमाकूळ घातलाय. कोरोना संकटाचा सामना करत असताना अनेकांना आपले रोजगार गमवावे लागलेत. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आलीये. यामुळे तणावात आलेल्या अनेकांनी आत्महत्येचा पर्याय निवडताना मागचा पुढचा विचारही केला नाही. मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कर्मचारी वर्गावर झालाय. आता जीनजीवन हळुहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालीये. अनेक ठिकाणी पुन्हा रोजगाराच्या संधी आता उपलब्ध होऊ लागल्यात. अशातच ऑईल इंडिया कंपनीने नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी एक खुशखबर आणली आहे.

भारत सरकारच्या नवरत्न कंपनी ऑईल इंडियाने अभियंता, केमिस्टसह वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती काढलीये. इच्छुक उमेदवार १९ जानेवारी २०२१ पर्यंत या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. पदांसाठी अर्ज करण्याबाबत संपूर्ण माहितीसाठी उमेदरावांनी जाहिरात पहावी. तसंच खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती मिळवावी.

पदांचा तपशील आनी वेतन

१. ड्रिलिंग अभियंता – २ पदे, वेतन ५०,००० हजार रुपये
२. आयटी अभियंता – १ पदं, वेतन ४५, ००० हजार रुपये
३. केमिस्ट – १ पदं – वेतन ५०,००० हजार रुपये
अर्ज करण्याची अंतिम मुदत – १९ जानेवारी २०२१

वयोमर्यादा

या पदासाठी उमेदवाराची कमाल मर्यादा ६५ वर्षे निश्चित केली आहे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे

शैक्षणिक पात्रता

उमेदवारास किमान शिक्षण म्हणून इंजिनिअर क्षेत्रात पदवी असणं आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचावी.

अर्जाची प्रक्रिया

अर्ज डाऊनलोड करून भरा आणि शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवा

ई-मेल आयडी- [email protected]

अधिकृत संकेतस्थळ- https://www.oil-india.com/

अधिसूचना आणि अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇🏻

https://www.oil-india.com/Current_openNew.aspx

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!