JOB VARTA | महिलांसाठी स्वावलंबी होण्याची सुवर्ण संधी

२३ सप्टेंबर २०२२ अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः महिलांसाठी चांगली बातमी… तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असात तर तुम्हाला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. गोवा सरकारच्या महिला आणि बाल विकास संचालनालय विविध पदांसाठी विविध पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी भरती सुरू करतंय. अशा परिस्थितीत भरतीची पात्रता आणि नियम तपासल्यानंतर, उमेदवारांनी त्यांच्या इच्छुक पदांसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.

हेही वाचा:राज्यात अपघाती मृत्यूचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त…

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीससाठी पदभरती

गोवा सरकारच्या महिला आणि बाल विकास संचालनालयाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठीची जाहीरात प्रकाशित केलीए. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र महिला उमेदवारांनी कोऱ्या कागदावर आपल्या वडिलांचं किंवा पतीचं नाव, पत्ता, वय, शिक्षण, फोटो, अनुभव असल्यास तसा तपशील नमूद करत अर्ज करावा. या जागा पूर्णतः मानद तत्त्वावर भरण्यात येतील.

पदासाठीचे मानधन

या पदांसाठी मासिक मानधन हे अंगणवाडी सेविकांसाठी रुपये १० हजार आणि अंगणवाडी मदतनीसांसाठी रुपये ६ हजार असेल. या अंगणवाडी सेविका आणि मतदनीसांना एका वर्षातील किमान ३०० दिवस ते ही पूर्ण दिवस काम करणं आवश्यक आहे.

पदांसाठीचे पात्रता निकष

या पदांसाठीचे पात्रता निकष महिला आणि बाल विकास संचालनालयाने जारी केलेत. अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतीन या दोन्ही जागांसाठी उमेदवार किमान १२वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचं वय १८ ते ३५ वर्षं वयोगटातील असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार संबंधित गट रहिवासी असावी. जर फिडर क्षेत्र दोन ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या गटात येत असेल तर अश्या परिस्थितीमध्ये दोन्ही गटातून उमेदवार दोन्ही जागांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

हेही वाचा:आयआरबी-गोवा पोलीस बढत्यांवरून आमनेसामने…

अर्जसोबत जोडायची कागदपत्रे

कोऱ्या कागदावरील अर्ज हा आयसीडीएसच्या संबंधित सी डी पी ओ, प्रकल्प/तालुका यांना उद्देशून लिहिलेला असावा आणि त्याचबरोबर अर्जासोबत १५ वर्षे रहिवासाचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रांच्या प्रती, जातीचा आणि अनुभवाचा दाखल असल्यास तो जोडावा.

वरील कागदपत्रांसह असलेला अर्ज हा ज्या संबंधित गटामध्ये अंगणवाडी येत असेल त्या संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना २३ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचणं आवश्यक आहे. मुलाखतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या नवांची यादी त्यांच्या मुलाखतीच्या तारखांसह सीडीपीओ यांच्या कार्यालयातील सूचना फलकावर ७ ऑक्टोबर २०२२ रोजी लावण्यात येईल. या मुलाखतींसाठी स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची निवड त्यांच्या वैद्यकीय स्वास्थ्य चाचणीवर अवलंबून राहील.
चला तर मग, जर तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी करायची आहे, तर कागद आणि पेन उचला आणि लगेच अर्ज करा..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!