संकटातही संधी! नर्स आणि डॉक्टर्ससाठी नोकरीची संधी

मॅजेस्टिक सुरु करणार कोविड केअर सेंटर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : नामांकित मॅजेस्ट्रीट ग्रूपनं गोव्यात कोविड केअर सेंटर उघण्याच्या हालचाली सुरु केल्यात. एकूण ५० बेड्सचं कोविड केअर फॅसिलिटी सेंटर गोव्यात मॅजेस्ट्रीक प्राईड ग्रूपकडून सुरु केलं जाणार आहे. त्यासाठी त्यांनी जाहिरात काढत, डॉक्टर्स आणि नर्सेसच्या पदभरतीसाठीची माहितीही दिली आहे.

एमबीबीएमस झालेले १० डॉक्टर्सची नेमणूक केली जाणार आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरच्या पोस्टसाठी आयुर्वेदिक डॉक्टरही संपर्क करु शकतात, असंही सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे नर्स पदासाठी ३० जागा असून त्यासाठीही पदभरती केली जाणार आहे. मेडिकलचे विद्यार्थी, नर्सिंगचं शिक्षण घेतलेले यासाठी अप्लाय करु शकतात. एकूण ३ महिन्यांचं कॉन्ट्रेक्ट सह पगार, प्रवास आणि जेवणाचा खर्च मॅजेस्टीक ग्रूपकडून दिला जाणार आहे.

इच्छुकांना डॉ. मिहिर चौधरी यांना संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यांचा मोबाईल नंबर ८३०८८४५०८७ असून तात्काळ योग्य उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहे. कोरोनाच्या कठीण काळात आरोग्य यंत्रणेवर ताण असताना मोठ्या संख्येनं डॉक्टर्स आणि नर्सेसची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी आता कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा संकल्प केलेलं मॅजेस्टीक प्राईड सध्या डॉक्टर्स आणि नर्सची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!