नोकरी शोधताय? मग ही बातमी तुमच्यासाठी! इथे मिळू शकते संधी…

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कुठे कुठे नोकरीच्या संधी आहेत, पगार किती मिळणार आहे, याबाबतची महत्त्वाची अपडेट्स आम्ही घेऊन आलो आहोत. खालील ठिकाणी नोकरीच्या संधी असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कुठे कसं करायचं अप्लाय आणि किती मिळू शकणार आहे पगार?
एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये नोकरीची संधी AAI
एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये पदभरती केली जाणार आहे. त्यासाठी नोटिफिकेशनही जारी करण्यात आलं आहे. एआयईच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला या नोकरीसाठी अप्लाय करता येऊ शकले. 15 डिसेंबरपासून याठिकाणी पदभरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. महत्त्वाचं म्हणजे याठिकाणी भरण्यात येणाऱ्या पदांना 60 हजारापासून ते 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. पदाप्रमाणे पगार दिला जाणार असल्याचं सांगितलं जातंय. अधिक माहितीसाठी तुम्ही या नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा.
केंद्र सरकारमध्येही नोकरभरती
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डातही नोकरीची संधी आहे. केंद्रीय प्रदूश नियंत्रण बोर्ड म्हणजे सीपीसीबी. कन्सलटंट पदासाठी केंद्राकडून भरती करण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबरपासूनच ही पदभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 18 डिसेंबरपर्यंत तुम्हाला या पदासाठी भरती करता येऊ शकले. इच्छुक उमेदवार या पदासाठी भरती करु शकतात. एका मुलाखतीद्वारे या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. 60 ते 80 हजारापर्यंत या पदासाठी पगार दिला जाणार आहे. शिवाय केंद्र सरकारी नोकरीचे सर्व फायदेही मिळण्याची शक्यताय.
डीआरडीओमध्येही नोकरीची संधी
डीआरडीओमध्ये अनेक पदांसाठी नोकरभरती करण्यात येते आहे. मैकेनिकल इंजिनियरिंग, ऑटोमोबाइल इंजिनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग आणि कंप्युटर सायन्स इंजिनियरिंग या पदांसाठी ही भरती सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही लेखी परीक्षेची अट यामध्ये नाही आहे. थेट वॉक-इन मुलाखतीद्वारे ही पदभरती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा आणि पात्र असाल, तर लगेच अप्लायही करुन टाका.