गोव्यात कुठे मिळेल नोकरी? इथे आहेत नोकरीच्या संधी!

Goan Varta Live | प्रतिनिधी
काम शोधताय? मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. गोव्यात नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गोवनवार्ता लाईव्ह काही खास माहिती घेऊन आलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी कुठे आहेत याची ही विशेष माहिती. ही माहिती आवडली तर शेअर करायला विसरु नका आणि ताजे अपडेट्स पाहण्यासाठी गोवन वार्ता लाईव्हला फॉलो करा.
मडगावच्या हिंदू फार्मसीत नोकरीची संधी
मडगावमधील हिंदू फार्मसीत वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. त्यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिंदू फार्मसीमध्ये मॅनेजर, फार्मासिस्ट, काऊंटर सेल्समन किंवा सेल्सगर्ल, कॅशियर, डेटा एन्ट्री ऑपरेटर इत्यादी पदांसाठी भरती करण्यात येते आहे. दरम्यान, तुमचं वय 40 पेक्षा कमी असेल तर तुम्ही या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करु शकता.
कोणत्या पदासाठी किती पगार आणि काय अटी?
पद – मॅनेजर
जागा – 1
अट – 5 वर्षांचा अनुभव
पगार – 20,000 किंवा त्यापेक्षा जास्त
पद – फार्मासिस्ट
जागा – 3
अट – फ्रेशरही अर्ज करु शकतात
पगार – 13 हजार किंवा त्यापेक्षा जास्त
पद – कॅशियर
जागा – 3
अट – किमान दोन वर्षांचा अनुभव, रात्री उशिरापर्यंत काम करण्याची इच्छा
पगार – 13 हजार किंवा त्यापेक्षा जास्त
पद – डेटा एन्ट्री ऑपरेटर
जागा – 2
अट – रिटेल फार्मसीमध्ये किमान 2 वर्षांचा अनुभव
वरील सर्व जागांसाठी खालील पत्त्यावर उद्या (16 जून)
सकाळी 11 ते दुपारी 1.30 या वेळेत इंटरव्हू घेतले जाणार आहे.
पत्ता – हिंदू फार्मसी कॉर्पोरेट ऑफिस, पहिला मजला, ऑफिस नं.13/14, सपना आर्केड, इशान ट्रेडिंग कंपनीच्यावर वर, मलभाट, मडगाव, गोवा, 403601
कॅशियरसाठी नोकरी
म्हापशाजवळीस खासगी कार्यालयात कॅशियर पदासाठी पदवीधर तरुणास संधी आहे. कॉम्पिटरचं ज्ञान असल्यास [email protected] या ई-मेल आयडीवर तुम्हाला अर्ज करता येईल.
आर्किटेक्टसाठी नोकरी
ऑटो कॅड, स्केचअप, एमएस ऑफिस, इंग्रजी, हिंदी आणि कोकणीचं ज्ञान असलेल्या आर्किटेक्टसाठी नोकरीची संधी आहे. इच्छुकांनी [email protected]वर आपले CV पाठवावेत.
अनुभव असलेल्यांसाठी बेकरीत संधी
बेकरी आणि पेस्ट्रीशी संबंधित अनुभव असलेल्यांनी नोकरीची संधी आहे. इच्छुकांनी 9322806130 नंबरवर संपर्क करावा. किंवा [email protected] वर सीव्हीही पाठवू शकता.
प्राथमिक शाळेत शिक्षिका हवी आहे!
शिरोडातील प्राथमिक शाळेत शिक्षिकेसाठी नोकरीची संधी आहे. त्यासाठी थेट मुलाखती 21 जूनला पार पडणार आहे. इच्छुकांनी 21 जूनला 10 वाता शिरडोच्या या शाळेत मुलाखतीसाठी अर्ज करता येईल. मॅटर्निटी लिव्हवर असणाऱ्या शिक्षिकेच्या जागी ही पदभरती केली जाणार आहे.
पत्ता – SES Daffodil’s Primary School, Shiroda
घरकामासाठी माणूस हवाय!
हाताला सध्या काहीच काम नसेल आणि घरकाम करण्याची तयारी असेल, तर अशांसाठी बांबोळीत एक नोकरीची संधी आहे. बांबोळीतील एका कुटुंबाला घरकाम करणारा माणूस हवाय. इच्छुकांना अर्ज करण्यासाठी 8999314990 वर संपर्क करावा.