नोकरीच्या शोधात आहात, मग वाट कसली पाहताय? हे वाचाच!

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन गोवन वार्ता लाईव्ह आपल्या समोर आलं आहे. जर तुम्हाला मीडियात काम करण्याची मनापासून इच्छा असेल, तर ही बातमी मनापासून वाचा. कारण या माध्यमातून आम्ही तुम्हाला गोवन वार्ता लाईव्हमध्ये असलेल्या नोकरीच्या संधीची माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर खरंच गोवन वार्ता LIVE मध्ये काम करण्याची इच्छा असल्यास पात्रता, अटी, मिळणारा पगार, कुठे अप्लाय करायचं, या सगळ्याची माहिती खाली सविस्तर दिली आहे. त्यामुळे शांतपणे वाचा आणि तत्काळ दिलेल्या नंबरवर नोकरीसाठी अर्ज करा.

गोवन वार्ता LIVE मध्ये काही महत्त्वाच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतील कोणत्या पदासाठी तुम्ही फिट आहात? तुमच्या अनुभव कोणत्या पदासाठी कामाला येऊ शकेल? तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे? तुम्हाला पगार किती मिळेल? काम काय करावं लागणार आहे? हे सगळं जाणून घेण्यासाठी खालील माहिती शांतपणे समजून घ्या. शिवाय गरजूंपर्यंत ही माहिती शेअर करायलाही विसरु नका.

पद क्रमांक १. तालुका वार्ताहर/तालुका प्रतिनिधी/ रिपोर्टर

गोव्यात १२ तालुके आहेत. पणजीसह राज्यातील बाराही तालुक्यांसाठी गोवन वार्ता लाईव्हसाठी स्थानिक प्रतिनिधी नेमले जाणार आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत असलेल्या गोव्यातील बाराही तालुक्यांसाठी गोवन वार्ता लाईव्हला तालुका प्रतिनिधी हवे आहेत.

जर वार्तांकन म्हणजेच रिपोर्टिंग करणं तुमचं पॅशन असेल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. जर वार्ताहर किंवा तालुका प्रतिनिधी म्हणून जर तुम्ही याआधी काम केलेलं असेल, तर दुधात साखर. या पदासाठी किमान मराठी आणि कोकणी भाषा बोलता आणि लिहिता येणं आवश्यक आहे. शिक्षणाची तशी मोठी अट नाही. पण किमान लिहिता बोलता यावं. वयाचीदेखील अट नाही, पण माणूस मनाने तरुण आणि काम करण्यासाठी तत्पर असणं अपेक्षित आहे. टीव्ही मीडिया आणि डिजीटल मीडिया यांचं ज्ञान असावं.

महत्त्वाचं म्हणजे बातम्यांची चांगली समज असावी. व्हिडीओ क्रीएशनचं ज्ञान आवश्यक आहे. या सगळ्यासोबतच स्थानिक पातळीवर तुमचं चांगलं नेटवर्क असेल, तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अर्ज करु शकता.

रिपोर्टिंग हा काही सकाळी १० ते संध्याकाळी ७ असा जॉब नसतो. त्यामुळे जर तुम्ही एका विशिष्ट वेळेतच काम करण्याच्या इराद्यानं नोकरी पाहत असाल, तर कृपया अर्ज करण्याची तसदीही घेऊ नका. फुकट मनोरंजन केलं जाणार नाही.

पण जर प्रामाणिक आणि पूर्णपणे झोकून देऊन काम करण्याची इच्छा असेल तर या संधीचं सोनं तुम्हीच करु शकता. त्यामुळे तुमच्यात रिपोर्टिंगचं पॅशन असेल, तर वाट कसली पाहताय? लगेचच आपला सीव्ही [email protected] या मेल आयडीवर पाठवा. किंवा (०८९९९६६०६५६) या नंबरवर थेट फोनही फिरवू शकता. तुमची रितसर मुलाखत घेतली जाईल. पगार किती देणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! तर सिलेक्ट झालातच तर मग पैशापाण्याचंही थेट प्रत्यक्ष बोलू आणि नक्की करुन टाकू.

थोडक्यात –

पदाचं नाव – रिपोर्टर
एकूण पदं – १२
अट – मराठी आणि कोकणी, इंग्रजी भाषेवर पकड आवश्यक, व्हिडीओचं ज्ञान
नोकरी – पूर्णवेळ
अनुभव – नसेल तरी चालेल, असल्यास प्राधान्य

पद क्रमांक २. सेल्स एक्झिक्युटीव्ह – Sales Executive

गोव्याच्या कानाकोपऱ्यात आता गोवन वार्ता LIVEची वेबसाईट पोहोचलेली आहेच. त्यापाठोपाठ गोवन वार्ता LIVE हे चॅनेल आता केबल टीव्हीवर गोव्यातच नव्हे तर गोव्यासह कर्नाटकातील कारवार आणि शेजारच्या सिंधुदुर्गातही दिसू लागलंय. सगळीकडे गोवन वार्ता LIVE वेगानं आपली छबी तयार करतंय आणि प्रेक्षकांमध्येही याचा बोलबाला आहे. वेगानं वाढणाऱ्या या नेटवर्कसाठी तातडीनं दोन Sales Executive हवे आहेत. मार्केटिंग आणि सेल्स याचा तुम्हाला अनुभव असेल, तर तुम्ही या पदांसाठी तातडीनं अर्ज करु शकता. प्रथम अर्ज करणाऱ्यांनी प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे उशिरा अप्लाय केल्यास, संधी हुकली, तर त्याला आम्ही जबाबदार नाही. आणि जरी अनुभव नसेल, तरीही तुम्ही प्रयत्न तर नक्कीच करु शकता.

काय काय करावं लागणार?

सेल्स, मार्केटिंग या शब्दातूनच कामाचं स्वरुप तुमच्या लक्षात आलं असेल. जर तुम्ही या क्षेत्रात याआधी काम केलेलं असेल किंवा नसेल, तरीही तुम्हाला गोवन वार्ता LIVE संधी देऊशकतं. फक्त तुमच्यात सेल्स आणि मार्केटिंगचा स्पार्क असणं गरजेचं आहे. त्यासाठीचं अधिकृत शिक्षण तुम्ही घेतलं असेल, तर उत्तमच. आणि जर नसेल घेतलं तरीही हरकत नाही. फक्त तुमच्या कामाचा अनुभव या क्षेत्राशी निगडीत असल्यास तुमचा या पदासाठी निश्चितच विचार केला जाईल. या पदावर काम करण्यासाठीचं ठिकाण पणजी असणार आहे. ९ तास कामाची वेळ असेल. रविवारी सुट्टी असेल. पगार किती मिळणार, हे तुम्ही सिलेक्ट झालात, की लगेचच सांगू!

गोवन वार्ता LIVEच्या टीमसोबत जर तुम्ही मार्केटिंगसाठी योगदान देऊ इच्छित असाल, तर ही संधी अजिबात दवडू नका. ही पूर्णवेळ नोकरी असणार आहे. पार्ट टाईम नाही! उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी प्रत्येक एक असे एकूण दोन Sales Executive तत्काळ भरले जाणार आहेत. त्यामुळे वाट कुणाची बघताय, लगेचच (०८९९९६६०६५६) या नंबरवर फोन करा आणि अप्लाय करा. फोन करायला भीती वाटत असेल, तर [email protected] या e-Mail Id वर मेल करा.

थोडक्यात –

पदाचं नाव – Sales Executive
कामाचं ठिकाण – पणजी
एकूण पदं – २
अट – पदवीधर, इंग्रजी, मराठी, कोकणीचं उत्तम ज्ञान, संवाद कौशल्य, प्रेझेंटेबल

महत्त्वाची गोष्ट – विनाकारण फोन करुन नसत्या चौकशा करणाऱ्यांना एन्टरटेन केलं जाणार नाही. सीरियसली नोकरीच्या शोधात असाल, तरच फोन करा. धन्यवाद! आणि बेस्ट ऑफ लक. आणि हो.. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर गरजूंपर्यंत शेअर करायला विसरु नका.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!