नोकरी शोधताय? ती ही गोव्यात? मग ही बातमी तुमच्यासाठीच!

माहिती आवडली तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरु नका

Goan Varta Live | प्रतिनिधी

नोकरीच्या शोधात असाल, तर गोवनवार्ता लाईव्ह तुमच्यासाठी काही खास माहिती घेऊन आलं आहे. कोरोना महामारीच्या काळाच अनेकजण बेरोजगार झालेत. तर काही जण नवं काम शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या श्रेत्रातील गोवा राज्यापुरत्या मर्यादित काही नोकरीच्या संधी कुठे आहेत, याची माहिती घेऊन आम्ही आलो आहोत. चला तर पाहुयात कुठे आहेत नोकरीच्या संधी…

नोकरी नं. ०१

नर्स किंवा केअरटेकर

घरातील वरीष्ठांची किंवा आजारी माणसाची काळजी घेण्यासाठी नर्स किंवा केअरटेकर हवा आहे. सदर व्यक्तीच्या खाण्या-पिण्याची सोय कामाच्या ठिकाणी केली जाईल. किती पगार दिला जाईल असा प्रश्न पडला तर त्यासाठीची माहितीही देण्यात आली आहे. या कामासाठी 10 ते 20 हजाराच्या दरम्यान मुलाखत घेऊन योग्य उमेदवाराला पगार दिला जाईल. इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी 9326888815, 8956141564 या नंबरवर संपर्क करावा..

नोकरी नं. 02

तुम्हाला गाडी चालवता येत असेल आणि ड्रायव्हरचं काम करण्यासाठी तुम्ही तयार असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची संधी आहे. एका खासगी गाडीसाठी चालक हवाय. पणजी असणाऱ्या कंपनीसाठी ड्रायव्हरच्या पदासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर तुम्ही 9226741741 वर संपर्क करावा.

नोकरी नं. 03

सिक्युरीटी गार्डसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये सिक्युरीटी सुपरवायजर पदासाठी नोकरी आहे. या पदासाठी 15 हजार रुपये पगारही दिला जाणार आहे. या पदासाठी अर्ज करायचा असेल, तर पुढे दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा. मोबा. नं. 8007108570, 9423322924

नोकरी नं. 04

तुम्ही शिक्षिका आहात किंवा तुम्ही शिक्षिका म्हणून काम शोधत असाल, तर तुमच्या भरपूस संधी आहे.

संधी क्रमांक 1 – ताप्तुरत्या स्वरुपासाठी प्राथमिक शाळेसाठी अंडरग्रॅच्युएट शिक्षिका हवी आहे. 46 दिवसांसाठी काम करण्याची संधी मिळेल. जी.एस आमोणकर विद्या मंदिर, म्हापसामध्ये या पदासाठी शिक्षिका हवी आहे. इच्छुक उमेदवारांनी 28 जूनला त्यासाठी शाळेत सकाळी 9 वाजता मुलाखतीसाठी जावं.

संधी क्रमांक 2 – डीएड झालेल्या आणि बारावी पास असलेल्या उमेदवारासाठीही नोकरीची संधी आहे. 152 दिवसांसाठी शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी इच्छुकांना आपले अर्ज, सीव्ही, फोटो आणि इतर महत्त्वाची कागदोपत्री माहिती खालील पत्त्यावर पाठवावी. पत्ता – Manager/Headmistress, Maria Bambina Convent High School, Cuncolim-Goa महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या सात दिवसांत नोकरीसाठी अर्ज करायचा आहे.

सधी क्रमांक 3 – प्राथमिकसाठी शिक्षक हवाय. म्हापसाच्या आसगावमधील अल शदाय शाळेत प्राथमिक शाळेसाठी शिक्षक पद भरण्यात येणार आहे. इच्छुकांनी या पदासाठी 9764794124 वर फोन करावा किंवा [email protected] या इमेल आयडीवरही अप्लाय करता येऊ शकेल.

नोकरी क्रं. 04

पूर्ण वेळ नोकरी करायची नसेल, तर अशांसाठी एका पार्ट टाईम नोकरीची ऑफर आहे. मडगावात पार्ट टाईम डिलिव्हरी स्टाफची गरज आहे. यासाठी फक्त मुलांना किंवा पुरुषांनाच नोकरी दिली जाणार आहे. या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तर सकाळी 10 ते संध्या 5 या वेळेत 9373126962 या क्रमांकावर फोन करावा. पत्ता – श्री मारउती कुरीयर, बाबॉय कॉमर्स सेंट्र, बिग जी मॉलच्या मागे, मडगाव

तर या होत्या गोव्यातील काही नोकरीच्या संधी. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर नक्की आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये, कुटुंबीयांमध्ये किंवा गरजूंमध्ये शेअर करायला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरु नका. तसंच गोवनवार्ता लाईव्हच्या फेसबूक पेजला आणि व्हॉट्सअप ग्रूपमध्ये तुम्ही स्वतःला ऍड करुन घेऊ शकता. जेणेकरुन ताज्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या आणि कामाची माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहिल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!