JOB ALERT | रेल्वे व्हील फॅक्टरीमध्ये 10 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी

पात्र आणि इच्छुक उमेदवार 13 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी आरडब्ल्यूएफ अप्रेंटिस भरती 2021 साठी अर्ज करू शकतात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ज्या उमेदवारांना रेल्वेमध्ये काम करायचं आहे त्यांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे. रेल्वे व्हील फॅक्टरी (आरडब्ल्यूएफ) ने ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी भरतीची अधिसूचना rwf.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 13 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी आरडब्ल्यूएफ अप्रेंटिस भरती 2021 साठी अर्ज करू शकतात. रेल व्हील फॅक्टरी भरती 2021 द्वारे एकूण 192 रिक्त जागा भरल्या जातील.

हेही वाचाः नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराला मान्यताप्राप्त मंडळाकडून 50% गुणांसह 10 वीचा वर्ग आणि संबंधित विषयातील नॅशनल ट्रेड एप्रेंटिस प्रमाणपत्र नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) कडून असणं आवश्यक आहे.

महत्वाची तारीख

अर्ज सुरू होण्याची तारीखः 13 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीखः 13 सप्टेंबर 2021

आरडब्ल्यूएफ ट्रेड अप्रेंटिस वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षं असली पाहिजे (सरकारी निकषांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता प्रदान केली जाईल).

हेही वाचाः १०० टक्के पहिला डोस पूर्ण झालेलं गोवा देशातील दुसरं राज्य

रेल्वे भरती 2021:

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 12,261 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.

निवड कशी होईल?

उमेदवारांना इयत्ता 10 वी मधील गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे रेल्वे व्हील फॅक्टरी ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

आरडब्ल्यूएफ ट्रेड अप्रेंटिस भरती 2021 साठी अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार कागदपत्रांसह अर्ज मुख्य मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलाहंका, बंगलोर -560064 या कार्यालयात 13 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सर्व कामकाजाच्या दिवशी पाठवू शकतात.

हेही वाचाः SHOCKING| मडगावातील राम मनोहर लोहियांच्या पुतळ्याची विटंबना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!