JOB ALERT | 12वी पास उमेदवारांसाठी ‘एलडीसी’ म्हणून नोकरीची संधी

गोवा सरकारच्या शिक्षण संचालनालयाने निम्न विभागीय लिपिकांची भरती करण्याचे जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः जर तुम्ही 12वी पास झाल्यानंतर सरकारी नोकरीची तयारी करत असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गोव्यात 12वी विद्यार्थ्यांसाठी लोअर डिव्हिजन क्लर्क अर्थात एलडीसीची भरती केली जाणार आहे. गोवा सरकारच्या शिक्षण संचालनालयाने निम्न विभागीय लिपिकांची भरती करण्याचे जाहीर केले आहे.

गोवा शिक्षण संचालनालयाने 29 नोव्हेंबर रोजी निम्न विभाग लिपिक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. भरती जाहिरातीनुसार, लोअर डिव्हिजन क्लर्कच्या एकूण 70 जागा भरण्यात येणार आहेत. यापैकी 43 रिक्त जागा अनारक्षित आहेत आणि 11 एसटी, 8 ओबीसी आणि 8 ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

लोअर डिव्हिजन लिपिक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी गोवा सरकारच्या goa.gov.in वेबसाइटला भेट द्या. इच्छूक उमेदवारांना या वेबसाइटवर जावून ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 देण्यात आली आहे.

लोअर डिव्हिजन लिपिक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

लोअर डिव्हिजन लिपिक पदासाठी, उमेदवार किमान 12 वी पास असावा. यासोबतच कॉम्प्युटर एप्लिकेशन/ऑपरेशनचे ज्ञानही त्याला असायला हवे. इंग्रजीमध्ये किमान 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती असणे आवश्यक आहे.

निम्न विभाग लिपिक पदासाठी वयोमर्यादा

निम्न विभागीय लिपिक पदासाठी उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र राज्य राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!