JOB ALERT |भारतीय तटरक्षक दलामध्ये 350 जागांवर भरती

अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 350 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 350 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 जुलैपासून सुरू होणार आहे.

हेही वाचाः जीवन ज्योती, सुरक्षा बिमाचे लाभार्थी सुमारे ४.९५ लाख; दावे मात्र ६३९!

कोणत्या पदांसाठी भरती?

भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार नाविक (जनरल ड्युटी) नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल) आणि यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) या पदांसाठी भरती होणार आहे.

हेही वाचाः शिक्षा व्हिजन डिचोलीसाठी, डिचोलीवासियांसाठी

पदसंख्या

नाविक (जनरल ड्युटी):260
नाविक (डोमेस्टिक ब्रँच): 50
यांत्रिक (मेकॅनिकल): 20
यांत्रिक (इलेक्ट्रिकल): 13
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स): 07

हेही वाचाः बार्देशमध्ये कळंगुट श्रीमंत, तर कामुर्ली पंचायत गरीब

अर्ज कसा करायचा?

पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 2 जुलै ते 16 जुलैच्या दरम्यान आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करु शकतात.

हेही वाचाः भरपूर ढिलाई आणि कर्फ्यूत वाढ! हीच तिसऱ्या लाटेसाठी अनुकूल स्थिती?

शैक्षणिक पात्रता

नाविक (जनरल ड्युटी): उमदेवार बारावी विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह उत्तीर्ण झालेले असावेत.
नाविक (डोमेस्टिक ब्रँच): मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेला असावा.
यांत्रिक : मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवार दहावी उत्तीर्ण झालेला असावा. इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, रेडिओ पॉवरमधील एआयसीटीईद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून पदविका उत्तीर्ण असावा.

हेही वाचाः कोरोना प्रतिबंधक लस घ्या आणि सलुनमध्ये मिळवा 50 टक्के सूट !

निवड प्रक्रिया

भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदासाठी तीन टप्प्यात निवड प्रक्रिया राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमदेवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर त्यांना शारीरिक चाचणी देखील घेतली जाईल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. पहिले दोन टप्पे यशस्वी पार केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करुन वैद्यकीय चाचणीसाठी बोलावलं जाईल. यशस्वी उमदेवारांना प्रशिक्षणासाठी बोलावलं जाईल, फेब्रुवारी 2022 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः हृदयद्रावक : दोन मुलींसह पित्यानं केली आत्महत्या

परीक्षा फी

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमदेवारांना कोणतंही परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही. इतर उमेदवारांना 250 रुपये परीक्षा फी भरावी लागेल. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटला भेट द्यावी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!