JOB ALERT | DRDO मध्ये रिसर्च फेलोशिपची संधी; ‘एवढं’ मिळणार स्टायपेंड

अधिसूचना अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिकल अँड अलाइड सायन्सेस (इनमास) मध्ये संशोधन फेलोशिपसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार रिसर्च असोसिएट (आरए) आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) साठी अर्ज करू शकतात. यासाठी अधिसूचना अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जारी करण्यात आली आहे. उमेदवार अधिसूचनेतील संपूर्ण तपशील तपासून अर्ज करू शकतात.

हेही वाचाः याच आठवड्यात गोवा विद्यापीठात कुलगुरूंची निवड शक्य

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर आहे. रिसर्च असोसिएटच्या 04  आणि कनिष्ठ संशोधन फेलोच्या 06  पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांना अनुक्रमे 54,000/- आणि महिन्याला रु.31,000/- असं पोस्टनिहाय वेतन दिलं जाईल. डीआरडीओच्या नियमांनुसार उमेदवार एचआरए मिळवण्यास पात्र असतील. कार्यकाळाची मुदत अनुक्रमे 2 वर्षे आणि 5 वर्षं आहे.

इच्छुक उमेदवारांनी माहिती अधिकृत अधिसूचनेत तपासावी

रिसर्च असोसिएट पदासाठी उमेदवाराकडे संबंधित विषयातील पीएचडी असणं आवश्यक आहे. मास्टर्स पदवीधारक आणि नेट/गेट पात्र उमेदवार कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पदानुसार कमाल वय मर्यादा अनुक्रमे 35 वर्षं आणि 28 वर्षं आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वरच्या वयोमर्यादेत शिथिलता देण्याचीही तरतूद आहे. इतर सर्व माहिती उमेदवार अधिकृत अधिसूचनामध्ये तपासू शकतात.

हा व्हिडिओ पहाः Van-Mhavlinge Dispute | वन-मावळींगेवासीय सरकारसोबतच

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!