फोटोशॉपपासून ग्राफिक डिझाईनरपर्यंत! गोव्यातील या ठिकाणी आहेत नोकरीच्या संधी

नोकरीच्या शोधात आहात? मग ही माहिती तुमच्यासाठीच!

Goan Varta Live | प्रतिनिधी

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गोवन वार्ता लाईव्ह काही खास माहिती घेऊन आलंय. गोव्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरीच्या संधी कुठे आहेत, त्याठिकाणी अप्लाय कसं करायचं? पगार किती मिळू शकेल, या संदर्भातली माहिती घेऊन गोवन वार्ता लाईव्ह आलं आहे. त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला, तुमच्या मित्रमैत्रिणींनी उपयोगी पडणार असेल, तर त्यांना शेअर करायला विसरु नका. गोव्यातील नोकरीच्या संधी कुठे आहे, याचा घेतलेला हा खास आढावा…

तुम्हाला फोटोशॉप येतं?

बस्तोड्यामध्ये ज्युनिअर फोटोशॉप आर्टिस्टची गरज आहे. त्यासाठी लवकरच पद भरलं जाणार आहे. जर तुम्हाला फोटोशॉप येत असेल, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करु शकता. या नोकरीसाठी पगार किती दिला जाणार, यासंदर्भातली माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही 9820681341 या नंबर WhatsApp करु शकता. रिटचिंग, कट आऊट्स, कलर करेक्शन असं कामाचं स्वरुप असणार आहे. कामाच ठिकाण बस्तोडा असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला इथं काम मिळवण्याची इच्छा असेल, तर त्वरीत संपर्क करा.

ग्राफिक्स डिझानरसाठी संधी!

एका प्रतिष्ठीत ऍड एजेन्सीमध्ये ग्राफिक डिझानर पदासाठी नोकरीची संधी आहे. त्यासाठी किमान १ ते २ वर्षांचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. पाटो प्लाझा, पणजीत इथं असलेल्या ऍड एजेन्सीसाठी कोरल ड्रॉ, फोटोशॉप, एडोब एल्युस्ट्रेटर येणाऱ्यांनी या नोकरीसाठी अर्ज केला, तर त्यांना चांगली संधी मिळू शकेल. शिवाय अनुभव जरी नसेल, आणि फ्रेशर असाल, तरीही प्रयत्न करायला हरकत नाही. इच्छुकांनी [email protected] या इ-मेल आयडीवर आपले सीव्ही पाठवावेत..

हेही वाचा : घरकामापासून इंजिनिअरपर्यंत! गोव्यातील नोकरीच्या वेगवेगळ्या संधी

फार्मासिस्टसाठी नोकरी आहे!

फार्मासिस्टसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. पणजी आणि मडगावमधील Elixir मेडिकोस केमिस्ट आणि ड्रगिस्टमध्ये फार्मासिस्ट हवे आहेत. त्यासाठी डी फार्मा केलेलं असणं बंधनकारक आहे. तुमच्याकडे जर डी फार्माची डिग्री असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करु शकता. बि फार्माची पदवी असलेल्यांनाही या पदासाठी विचारात घेतलं जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला फार्मासिस्ट म्हणून काम करायचं असेल तर तुम्ही 9765947535 किंवा ८६६९०३४५१५ वर संपर्क करावा.

हेही वाचा : गोवा पोलिस कॉन्स्टेबल भरती आता 16 जुलैपासून

लायब्ररीयन म्हणून काम करायला आवडेल?

पर्वरीत असणाऱ्या एका शाळेत लायब्ररीयनसाठी पदभरती केली जाणार आहे. त्यासाठी HSSC आणि सहा महिने लायब्ररी सायन्सचं सर्टिफिकेट असलेल्यांना नोकरीत प्राधान्य दिलं जाणार आहे. येत्या ७ दिवसांत त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज करु शकता.
पत्ता – Manager, Vidya Prabodhini Higher Secondary School, Vidyanagar, Porvorim, Goa 403 521.

हेही वाचा : खूशखबर! In Hand Salaryबाबतची मोठी बातमी आली! काय झाला निर्णय? वाचा सविस्तर

घरकाम करण्याची तयारी आहे?

जर तुमची घरकाम करण्याची तयारी असेल तर तुमच्यासाठीही नोकरीची संधी आहे. एका घरामध्ये घरकाम करण्यासाठी आणि एका लहान बाळाला साांभाळण्यासाठी मोलकरीण हवी आहे. वय शक्यतो ३० पेक्षा कमी असावं, अशी अटही घालण्यात आली आहे. जर तुम्हाला या संधीचं सोनं करायचं असेल तर ७७०९१३७७७७ या नंबरवर संपर्क करावा.

वरील नोकरीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर गरजूंपर्यंत पोहोचवायला विसरु नका. ही माहिती शेअर करताय ना?

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!