दिलासादायक निर्णय! ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांसह रिटायर्ड झालेल्यांना मिळणार वेतनवाढ

मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणार दिलासा

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : मरण पावलेले सरकारी कर्मचारी तसंच सेवानिवृत्तांच्या दिव्यांग अपत्यांकरिता कुटुंब निवृत्ती वेतनात मोठी वाढ मिळणार असल्याची माहिती कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि पेन्शन विभागाचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. या दिसादायक निर्णयाचा फायदा अनेक कुटुंबाना होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

salary

निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्त कल्याणविभागाला त्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असल्याचंही त्यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती देताना सांगितलं. अशा दिव्यांग मुलांची प्रतिष्ठा आणि काळजी घेण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष भर आहे, त्या अनुषंगानंच हा निर्णय घेण्यात आला असून दिव्यांग वारसांचं जीवन सुकर व्हावं आणि तसंच दिव्यांग अपत्याची काळजी, औषधोपचारांसाठी बराच आर्थिक खर्च येतो त्यासाठी पुरेशी आर्थिक मदत मिळावी हाही या निर्णयामागचा उद्देश असल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना पाच वर्षं पगार

आकाशवाणी वृत्त सेवा विभागानं याविषयीची माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ताही वाढवला होता. दीड वर्षाहून अधिक काळ वाढलेल्या डीए आणि थकबाकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला होता. गेल्या 1 वर्षात तीनदा महागाई भत्त्याला (डीए) ब्रेक लागला होता. परंतु आता 1 जुलैपासून सामान्य महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच आतापर्यंत केंद्रीय कर्मचार्‍यांना 17 टक्के मिळणारा महागाई भत्ता आता 11 टक्क्यांनी वाढून थेट 28 टक्के होणार आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता सरकार पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यास आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (सीसीईए) मान्यता दिली आहे.

हेही वाचा – Video | Government Employee | Good News | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही २८% डीए

कोरोना महामारीमुळे सरकारने डीए गोठविला होता. यासह माजी कर्मचार्‍यांच्या डीआरचे हप्तेही दिले गेले नाहीत. अर्थ मंत्रालयाने जून 2021 पर्यंत 50 लाखांहून अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचे मान्य केले होते.

हेही वाचा – वाढलेल्या डीएमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, हे जाणून घ्या

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!