जबरदस्त! आठवड्याला ३ सुट्ट्या देण्याच्या मोदी सरकारकडून हालचाली?

कर्मचाऱ्यांना तीन दिवस मिळणार आठवड्यातून सुट्टी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

नवी दिल्ली : कर्मचारी वर्गासाठी एक अत्यंत दिलासा देणारी आणि महत्त्वाची बातमी समोर येते आहे. आता लवकरच कर्मचाऱ्यांना तीन दिवस आठवड्यातून सुट्टी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. याबाबत मोदी सरकारकडून महत्त्वाच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आठवड्याचे फक्त चार दिवसच कामाचे असल्यास कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यताय.

नव्या कायद्यात खूशखबर?

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन चार कामगार कायदे तयार केलेत. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारकडून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. या नव्या कायद्यानुसार सरकारने 4 दिवसात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. त्यानुसार कर्मचाऱ्यांना दिवसाला एकूण १२ तास काम करावं लागणार आहे. आठवड्याला ४८ तास काम केल्यास तीन दिवस सुट्टी घेता येईल, असं बोललं जातंय. १२ तास चार दिवस काम केल्यास एकूण ४८ तास होतात. त्यानुसार तरतूद नव्या कायद्यामध्ये करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

Modi 800X450

खरंय की खोटं?

अर्थात या पर्यायाचा वापर करण्यासाठी कंपनी तसंच कर्मचाऱ्यांचीही सहमती आवश्यक असणार आहे. कर्मचाऱ्यांना या गोष्टीला सहमती दर्शवली तरंच अशाप्रकारे काम करुन सुट्ट्या घेता येऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या १ एप्रिलपासून ४ नवीन कामगार कायदे लागू होणार आहेत. त्यानुसार आता आठवड्याला ३ सुट्ट्या घेण्याची मुभा मिळते का याकडे सगळ्याच कर्मचारी वर्गाचं लक्ष लागलंय.

महत्त्वाचं म्हणजे १ एप्रिलच्या निमित्तानं एप्रिल फूल तर होणार नाही ना, अशीही शंका घेतली जाते आहे. त्यामुळे आता नव्या कामगार कायद्यातून कर्मचारी वर्गाला ३ दिवस सुट्ट्या आणि ४ दिवस काम, असा पर्याय उपलब्ध होतो का, हे पाहणं महत्त्वाचंय.

हेही वाचा –

वडापाव विकून 300 कोटीचा धंदा करणारा अवलिया

घर खरेदी करणं चांगलं की भाड्यानं राहणं चांगलं?

इन्फोसिसची नोकरी सोडली आणि पाणीपुरी विकून कमाल केली

प्रमोद महाजनांची मर्डर मिस्ट्री सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नाही!

ब्रेकअप झालाय? मग तर हे सिनेमे पाहायलाच हवे!

मिरची झाली गोड! तीन महिन्यात शेतकऱ्यानं असे कमावले 7 लाख

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!