सरकारी नोकरी शोधताय? मध्य रेल्वेत निघाल्या 2,500 जागा

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मध्य रेल्वेत हजारो पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठीची जाहिरातही निघाली आहे. तब्बल अडीच हजार पदं मध्य रेल्वेत भरली जाणार आहेत. मध्य रेल्वेची नोकरी म्हणजे केंद्र सरकारचा कर्मचारी होण्याची नामी संधी तरुणांना चालून आली आहे.

कोणत्या पोस्टसाठी भरती आणि किती पदं?

मध्य रेल्वे भरती २०२१ अंतर्गत आयटीआय पास असलेल्यांची भरती करण्यात येणार आहे. अप्रेंटीस पदाच्या एकूण २ हजार ५३२ रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्जही मागवले गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर का या नोकरीसाठी अप्लाय करायचं असेल तर ही बातमी संपूर्ण वाचा.

कधीपर्यंत अर्ज करता येईल?

मध्य रेल्वेत नोकरी हवी असेल, आणि तुम्ही आयटीआय केला असेल तर तुम्ही या नोकरीसाठी पात्र आहात अप्रेंटिंस पदासाठी ६ फेब्रुवारीपासून पदभरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्जही मागवले गेले आहेत. ५ मार्चपर्यंत तुम्हाला या पदासाठी अर्ज करता येतील. महत्त्वाचं म्हणजे फक्त तरुणांनाच या पदासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी तुम्ही वयाची अट नेमकी काय आहे, हेही जाणून घेणं गरजेचंय.

कुणाल अर्ज करता येईल?

२४ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे जर तुमचं वय २४ पेक्षा कमी वर्ष असेल तर तुम्ही या पदासाठी नक्की अर्ज करा. किंवा ज्यांचं वय कमी आहे, आणि जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना ही माहिती नक्की पोहोचवा.

बंपर भरतीची महत्त्वाची माहिती

पदाचे नाव काय : अप्रेंटीस
एकूण किती पदसंख्या : २५३२ जागा
शैक्षणिक पात्रता काय लागणार : ITI पास
वयोमर्यादेची अट काय : १५ ते २४ वर्षे
अर्ज करण्याची फि किती : रु. १००/-
अर्ज कसा करायचा : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटच तारीख काय : ५ मार्च २०२१
कुठे आहे नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, भुसावळ

अधिक माहिती कुठे मिळेल : खाली मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक केल्यास अधिक माहिती मिळेल.

https://cr.indianrailways.gov.in/

PDF जाहिरात : https://www.rrccr.com/PDF-Files/Act_Appr/Act_Appr_2020-21.pdf

हेही वाचा –

…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना रडू आलं!

प्रेरणादायी! शिवणकामातून नाव कमावणाऱ्या मांद्रेतील संजय सातोस्करांची यशोगाथा

NAVDURGA | कुळाव्याच्या स्वप्नात आली मडकईची श्री नवदुर्गा देवी

Electricity | दरवाढीचा शॉक! पेट्रोल डिझेलनंतर विजेचा नंबर

ओढणीच्या झोपाळ्याने केला घात!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!