नर्स, वॉर्डबॉय पदासाठी गोव्याच्या शेजारील राज्यात मोठी पदभरती

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : गोव्याच्या शेजारील राज्य असलेल्या महाराष्ट्रातील आरोग्य विभागात मोठी पदभरती करण्यात येणार आहे. यामध्ये नर्स आणि वॉर्ड बॉय पजदासोबत टेक्निशियन, जीएनएम पदासाठी भरती करण्यात येणार आहे. खुद्द महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील आरोग्य विभागात तब्बल १७ हजार पदांची भरती केली जाणार आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच याबाबत जाहिरात दिली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. एकूण ५० टक्के म्हणजेच ८ हजार ५०० पदांची जाहिरात दिली जाणार आहे. जिंजर नावाची एक आयटी कंपनी ही परीक्षा घेणार आहे. महाआयटी कंपनीनं ही कंपनी निवडली आहे. ओएमआर शीट या परीक्षेसाठी असणार आहे. सर्व बाबी पडताळून या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचीही शक्यता त्यांनी वर्तवली जातेय. ग्रामविकासमधील आरोग्यशी संबंधित तब्बल १० हजार आणि आरोग्य विभागात एकूण ७ हजार पदांसाठी भरती महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. अशा एकूण १७ हजार पदांसाठी करण्यात येणाऱ्या भरतीमुळे अनेकांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या मेगाभरतीसंदर्भातली जाहिरात केव्हा येते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा – नोकरी शोधताय का? मग हे नक्की वाचा…
करा सर्जरी! आयुर्वेदीक डॉक्टरांना केंद्र सरकारची परवानगी
चुकीला माफी नाही! कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ