नोकरी हवी? गाडी चालवता येते? मग ही बातमी वाचा!

लॉकडाऊनमुळे अनेक वाहनचालकांचा रोजगार बुडालाय. मात्र चिंता करु नका. नोकरीची संधी चालून आली आहे.

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

पणजी : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. लॉकडाऊनमुळे तर वाहनचालकांचा मोठा रोजगार बुडाला. प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या आणि बेरोजगार झालेल्या वाहनचालकांसाठी एक चांगली बातमी आहे.

गोव्यातील राज्यपालांचे सचिवालय, राजभवन येथे वाहनचालक पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर आहे.

शैक्षणिक पात्रता – दहावी पास

वयोमर्यादा – 45 वर्षे

नोकरीचं ठिकाण – गोवा

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्यपालांचे सचिव, राज्यपालांचे सचिवालय, राजभवन दोनपावला गोवा, अधिक माहितीकरिता पीडीएफ जाहिरात वाचावी.

पीडीएफ जाहिरात : https://bit.ly/308cuve

अधिकृत वेबसाईट : https://rajbhavan.goa.gov.in/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.