‘येस’ बँकेच्या ‘एफडी’च्या व्याजदरात बदल

गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: खासगी क्षेत्रातील बँक येस बॅंकने आपल्या एफडीचे दर बदलले आहेत. येत्या 3 जूनपासून हे नवे दर लागू केले आहे. जर तुम्हीही येस बॅंकमध्ये एफडी घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

हेही वाचाः शिवोलीतील पेट्रोल पंपाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र रद्द

नवे व्याजदर माहिती असणे गरजेचे

नव्या दरांनुसार बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज देत आहे. तर 15 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज देत आहे. त्याशिवाय 9 महिन्यांपासून ते 1 वर्षाच्या एफडीवर 5.75 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे. जर तुम्हालाही येस बॅंकेतील फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हे नवे व्याजदर माहिती असणं गरजेचं आहे.

हेही वाचाः भाजप आमदार, मंत्र्यांची शाळा सुरू

येस बॅंकेतील फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर

2 कोटींहून कमी रक्कमेच्या एफडीवर 7 दिवस ते 14 दिवसांपर्यंत 3.25 टक्के; 15 दिवस ते 45 दिवसांपर्यंत – 3.50 टक्के; 46 दिवस ते 90 दिवसांपर्यंत – 4 टक्के; 3 महिन्यांपेक्षा जास्त पण 6 महिन्यांपेक्षा कमी – 4.50 टक्के; 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक पण 9 महिन्यांपेक्षा कमी – 5 टक्के; 9 महिने किंवा त्यापेक्षा अधिक पण 1 वर्षांहून कमी – 5.25 टक्के; 1 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पण 2 वर्षांहून कमी – 6 टक्के; 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पण 3 वर्षांहून कमी – 6.25 टक्के; 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक 10 वर्षांपर्यंत – 6.50 टक्के व्याज मिळणार आहे.

हेही वाचाः मी बाबू आजगावकरांचा समर्थक नाही

ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर

तर सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंटपेक्षा अधिक व्याज मिळतो. यात बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींवर 3.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज देते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!