‘वी’ भारतातील युवकांना सक्षम बनवणार

रोजगार, कौशल विकासाच्या संधी देणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः करिअर आणि आयुष्यात यश संपादन करण्यासाठी एक चांगली नोकरी असणे आणि योग्य कौशल्ये आत्मसात करणे या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत भारतातील आघाडीची टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ‘वी’ ने नव्या सेवासुविधा सादर करत असल्याची घोषणा केली आहे, ज्यांचा लाभ घेऊन भारतातील युवकांना रोजगार शोधण्यात मदत होईल, स्वतःला अधिक जास्त रोजगारक्षम बनवता येईल, तसेच सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करण्यात देखील मदत मिळेल.

आपल्या ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांना पंख मिळावेत, अधिक चांगले भवितव्य निर्माण करता यावे यासाठी वी जॉब्स अँड एज्युकेशनने नोकरी शोधण्यासाठी वापरला जाणारा, भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म ‘अपना’, इंग्रजी शिकण्यात मदत करणारा प्लॅटफॉर्म ‘एनगुरू’ आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांच्या तयारीचा प्लॅटफॉर्म ‘परीक्षा’ यांच्यासोबत भागीदारी केली आहे.  

युवकांना आपली करिअर स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे

भारतात प्रचंड संख्येने असलेल्या प्रीपेड युजर्सना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशन ही वी ऍपवरील सुविधेचा लाभ घेऊन नोकरी शोधणे, इंग्रजी संभाषण कौशल्यांमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणे अशी सर्व उद्दिष्ट्ये एकाच ठिकाणी पूर्ण करता येतात. युवकांना आपली करिअर स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवणे हा याचा उद्देश आहे.

‘टुगेदर फॉर टुमॉरो’

या अनोख्या सुविधेबद्दल वोडाफोन आयडिया लिमिटेडचे सीएमओ श्री. अवनीश खोसला यांनी सांगितले, “‘टुगेदर फॉर टुमॉरो’ या वी च्या ब्रँड वचनाला अनुसरून आम्ही आमच्या ग्राहकांच्या दैनंदिन जीवनातील कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्नशील असतो, आमच्या ग्राहकांना जीवनात पुढे जाण्यात मदत करण्यासाठी सक्षम बनवणाऱ्याची भूमिका बजावणे आम्हाला ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे आम्ही काम करत असतो. भारतातील युवकांचे निरीक्षण करताना आमच्या असे लक्षात आले आहे की चांगली नोकरी मिळवणे व रोजगारक्षम बनणे ही त्यांची सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा असते. सध्याच्या युवकांसाठी डिजिटल कौशल्ये, इंग्रजी संभाषण उत्तम प्रकारे करता येणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तसेच सरकारी नोकरीला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या युवकांची संख्या देखील खूप जास्त आहे.  खासकरून द्वितीय तृतीय श्रेणीतील युवकांच्या बाबतीत हे प्रकर्षाने दिसून येते. या सर्व निरीक्षणांच्या व निष्कर्षांच्या आधारे आम्ही वी जॉब्स अँड एज्युकेशन सुविधा सुरु केली असून त्यासाठी अपना, एनगुरू आणि परीक्षा यांच्यासोबत सहयोग केला आहे.  आम्ही असे मानतो की, या एकात्मिक सुविधा वी ग्राहकांना स्पर्धेमध्ये आघाडी मिळवण्यासाठी आणि आपल्या करिअर महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवतील.”

वी ऍपवरील वी जॉब्स अँड एज्युकेशनचा लाभ घेऊन नोकरी शोधणे बनले सोपे 

द स्टेट ऑफ मोबाईल २०२२ अहवालाच्या निष्कर्षांनुसार संपूर्ण जगभरातील मोबाईल युजर्सच्या बाबतीत नोकरीचा शोध ही सर्वात मोठी कॅटेगरी असणार आहे.  बीसीजी आणि माइकल अँड सुसान डेल फाऊंडेशनचा संयुक्त अहवाल – ‘अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ द गिग इकॉनॉमी इन इंडिया’नुसार गिग अर्थव्यवस्थेच्या उदयामुळे एकट्या बिगर-शेती क्षेत्रामध्ये ९०० लाखांपर्यंत नोकऱ्या उपलब्ध होतील.

वी ऍपवरील वी जॉब्स अँड एज्युकेशन ‘अपना’ च्या सहयोगाने भारतातील सर्वात जॉब लिस्टिंगचा निःशुल्क प्राधान्यक्रमाने लाभ घेता येईल.  यामुळे कर्मचाऱ्यांच्या शोधात असलेल्यांना तुमचा प्रोफाइल दिसण्याचे प्रमाण दुपटीने वाढेल, अशाप्रकारे तुम्हाला मुलाखतीच्या संधी मिळण्याचे प्रमाण देखील दुपटीने वाढेल.  ही सेवा सर्व वी ग्राहकांसाठी निःशुल्क उपलब्ध असेल.     

काही महिन्यातच अपनाने ३५०० लाखांपेक्षा जास्त मुलाखती घेतल्या

या भागीदारीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना apna.co चे सीईओ आणि संस्थापक श्री. निर्मित पारीख यांनी सांगितले, “गेल्या अवघ्या काही महिन्यातच अपनाने ३५०० लाखांपेक्षा जास्त मुलाखती व व्यावसायिक पातळीवरील संवाद घडवून आणले आहेत. ‘वी’सारख्या आघाडीच्या टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी भारतातील कानाकोपऱ्यांपर्यंत इंटरनेट सेवांचा प्रसार केल्यामुळे हे शक्य झाले. इंटरनेट उपलब्ध झाल्यामुळे लोकांसाठी वेगवेगळ्या संधींची दारे खुली झाली, इतकेच नव्हे तर, व्यावसायिकांमधील श्रेणी भेदाभेद मिटवण्यात देखील इंटरनेटने लक्षणीय भूमिका बजावली आहे. आमच्या सर्वसमावेशक प्लॅटफॉर्ममार्फत येत्या काही वर्षात हा भेद पूर्णपणे पुसला जाईल याची आम्हाला खात्री आहे. कोट्यवधी लोकांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव घडवून आणण्याची आमची वाटचाल कायम सुरु आहे, आपल्या देशातील युवकांना डिजिटली सक्षम करण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या, स्थानिक संधी त्यांच्यापर्यंत सहजपणे पोहोचवण्यासाठी ‘वी’ सारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!