क्रेडिट कार्ड वापरा, पण प्रत्येक ठिकाणी नाही; जाणून घ्या आरबीआयचे नियम

लॉटरीची तिकिटे, स्वीपचे पैसे किंवा कोणत्याही प्रकारच्या सट्टेबाजीच्या खरेदीमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : प्रत्येकाला पैशाचे मूल्य समजतं, परंतु सध्याच्या डिजिटल युगात आपल्याला सर्वच ठिकाणी रोख रक्कम घेऊन जाण्याची गरज नाही. आपल्याला आर्थिक व्यवहारांसाठी डेबिट कार्ड, यूपीआयसारखे बरेच पर्याय आहेत. फक्त आपल्या खात्यात पैसे असणं आवश्यक आहे. खात्यात पैसे नसल्यासही चिंतेचं कारण नाही. अशा परिस्थितीत केवळ तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असायला हवं. क्रेडिट कार्ड असेल तर मजा करा, आपल्या गरजा पूर्ण करा, खरेदी करा आणि खरेदीचे पैसे नंतर द्या. तथापि, बर्‍याच ठिकाणी आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही.

हेही वाचाः CORONA UPDATE | राज्याचा रिकव्हरी रेट वाढला

अशा परिस्थतीत तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकत नाही

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आपण बर्‍याच ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, लॉटरीची तिकिटे, स्वीपचे पैसे किंवा कोणत्याही प्रकारच्या सट्टेबाजीच्या खरेदीमध्ये आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही. याशिवाय इतर काही ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करण्यास मनाई आहे. आपण फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये देखील क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही. कॉलबॅक सेवांमध्ये तसंच कोणत्याही प्रकारचे जुगार म्हणजे जुगार संबंधित व्यवहारातही आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत नाही. इतकंच नाही तर कोणतेही प्रतिबंधित मासिक खरेदी करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने (भारतीय रिझर्व बँक) क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अशा प्रकारचं पेमेंट्स करण्यावर बंदी घातली आहे.

हेही वाचाः 5G प्रकरणात जुही चावलाच्या अडचणी वाढल्या

जाणून घ्या नियम व कायदे

परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम,1999 (फेमा) आणि इतर कायदेशीर तरतुदींनुसार, वर उल्लेख केलेल्या सेवा किंवा उत्पादनांसाठी क्रेडिट कार्डचा वापर करण्यास मनाई आहे. या निर्देशांचे उल्लंघन केल्यास क्रेडिट कार्डधारकास जबाबदार धरून कार्ड स्वतःजवळ ठेवण्यापासून रोखलं जाऊ शकतं, असं आरबीआयच्या नियमांमध्ये म्हटलं आहे. तसंच एसबीआय कार्डच्या वतीने ग्राहकांना पाठवलेल्या ईमेलमध्ये याबाबत ग्राहकांना सावध करण्यात आलं आहे. या मेलमध्ये म्हटलं आहे की, बरेच फॉरेक्स ट्रेडिंग व्यापारी, कॅसिनो इ, हॉटेल्स किंवा वेबसाइट्स आहेत, जी उत्पादने आणि सेवांसाठी क्रेडिट कार्ड पेमेंटचा पर्याय देतात. त्यांच्या जाळ्यात अडकू नका. अशा माध्यमातून तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते. त्यामुळे या भानगडीत न पडण्याचा सल्ला एसबीआयने दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!