‘गोदरेज लॉक्स’तर्फे उत्पादनाच्या खरेदी मूल्याच्या २० पट किंमतीपर्यंतचा

घरफोडी गुन्ह्याबाबतचा मोफत विमा सादर; आपल्या ग्राहकांना अधिक व्यापक गृहसुरक्षा पुरविण्यासाठी; लिबर्टी जनरल इन्श्युरन्स लिमिटेडबरोबर भागीदारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसने आपली व्यवसाय शाखा गोदरेज लॉक्स गृह सुरक्षा दिनाचे पाचवे वर्ष १५ नोव्हेंबर २०२१ रोजी साजरे करणार असल्याचे आज जाहीर केले. या प्रसंगाच्या निमित्ताने, भारताचा विश्वास, गुणवत्ता आणि सुरक्षितता यांसाठी प्रतिशब्द असणाऱ्या गोदरेज लॉक्स ब्रँडने लिबर्टी जनरल इन्श्युरन्स लिमिटेडबरोबर भागीदारी केली असून गोदरेज लॉक्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी १२८० कोटी रुपयांपर्यंतचा घरफोडी विरुद्धचा विमा सादर केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून चोरी आणि घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांपासून नागरिकांनी सुरक्षीत आणि सक्रीय रहावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

ज्या ग्राहकांनी एडव्हान्टीज मालिकेतील डिजिटल डोअर लॉक्स आणि नव्याने सादर केलेली स्पेस टेक प्रो, ज्याची रचना आणि उत्पादन पेन्टाबोल्ट एरिस, पेन्टाबोल्ट इएक्सएस+, अलट्रिक्स आणि एस्ट्रोकॅन यांच्या साथीने संपूर्णपणे भारतात करण्यात आले आहे असे पहिले डिजिटल लॉक यांसारख्या सर्वोत्तम सुरक्षा बळकटी देणाऱ्या गोदरेज लॉक्सची खरेदी केली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी ग्राहकांनी केवळ पॅकेजिंगवर असणारा क़्युआर कोड स्कॅन करायचा आहे. त्यानंतर विमा योजना कार्यान्वित होण्यासाठी ग्राहकांना जीएसटीसह असलेले योग्य इनव्हॉईस सादर करण्याची गरज आहे. ज्या दिवशी विमा योजना कार्यान्वित झाली त्यापासून पुढचे १ वर्ष विमा ग्राह्य धरला जाईल आणि खरेदी केलेल्या कुलूपाच्या एमआरपीच्या वीस पट रक्कम विम्याची असेल. घरफोडी झालेल्या आणि कुलूप फोडले जाण्याचा अनुभव आलेले ग्राहक विम्यासाठी दावा करू शकतात. कुलूप फोडण्याचा प्रकार/घरफोडी यांसारख्या प्रसंगात ग्राहक/ पिडीत व्यक्तीला विम्यासाठी दावा करताना अधिकृत एफआयआरची प्रत सादर करणे आवश्यक ठरेल. विम्याच्या रकमेत दागिन्यांची चोरी आणि जास्त किंमतीची उत्पादने यांचे संरक्षणही मिळेल. गोदरेज लॉक्समध्ये वापरले जाणारे सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि दिला जात असलेला विमा यांच्या मिश्रणातून सुरक्षिततेचे आणखी एक आवरण चढवत आपल्या ग्राहकांची घरे अधिक सुरक्षीत बनवणे हे गोदरेज लॉक्सचे ध्येय आहे. त्यातून गोदरेज लॉक्स अत्यावश्यक गृह सुरक्षा उत्पादन बनत आहे.

गृह सुरक्षा दिवस आणि लिबर्टी बरोबर सहयोग याबद्दल भाष्य करताना गोदरेज लॉक्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी म्हणाले, “नागरिकांमध्ये घराच्या सुरक्षितते बद्दल जागृती निर्माण करण्यात गोदरेज लॉक्स नेहमीच आघाडीवर राहिलेले आहे. दशकानुदशके दर्जेदार उत्पादनांसह सुरक्षितता प्रदान करत असंख्य गृह निर्मात्यांसाठी आम्ही नेहमीच पसंतीचा पर्याय राहिलो आहोत. गृह सुरक्षा दिवसाच्या निमित्ताने लिबर्टी जनरल इन्श्युरन्स लिमिटेडबरोबर भागीदारी करून सुरक्षिततेचे आणखी एक आवरण चढवत आपल्या ग्राहकांची घरे अधिक सुरक्षीत करण्याबद्दल आम्हांला विशेष आनंद होत आहे. या सहयोगामुळे भारतातील ५०,००० हून अधिक घरांवर याचा प्रभाव पडेल आणि सर्वोत्तम दर्जाच्या सुरक्षेला बळकटी देणाऱ्या कुलपांच्या विक्रीत ३०%वाढ होण्याची अपेक्षा आहे.”

या सहयोगाबद्दल बोलताना लिबर्टी जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडच्या होल टाईम डायरेक्टर  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रुपम अस्थाना म्हणाल्या, “आजच्या संपूर्ण अनिश्चिततेच्या जगात विमा संरक्षण असणे या गोष्टीला कधी नव्हे एवढे महत्व प्राप्त झाले आहे. या भागीदारीतून ग्राहकांना घरफोडी सारख्या दुर्देवी प्रसंगापासून आपल्या घराचे संरक्षण करताना लिबर्टी जनरल इन्श्युरन्स मध्ये आम्ही असुरक्षिततेचे प्रमाण कमी करण्याचे ध्येय ठेवले आहे. लिबर्टी जनरल इन्श्युरन्स मध्ये आमचा या गोष्टीवर विश्वास आहे की लोकांना जेव्हा सुरक्षीत वाटते तेव्हाच त्यांची प्रगती होते. गोदरेज लॉक्स बरोबर असणाऱ्या भागीदारीतून अत्यंत काळजीपूर्वक अनपेक्षिताविरुद्ध संरक्षण देण्याचे आमचे ध्येय आहे.”

सुरक्षीत घरांच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गोदरेज लॉक्सने २०१७ मध्ये गृह सुरक्षा दिन साजरा करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून कंपनी आपल्या देशातील नागरिकांमध्ये घरांच्या सुरक्षिततेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी नवनवीन मार्ग सादर करत आहे. गेल्या वर्षी गोदरेज लॉक्स तर्फे सादर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, घरांच्या अधिक चांगच्या सुरक्षाविषयक तंत्रज्ञानासाठी जनजागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे मत ८५% पोलिसांनी व्यक्त केले. हा प्रश्न ध्यानात घेऊन गोदरेज लॉक्सने ग्राहकांना आपले घर अधिक सुरक्षीत करण्यासाठी सक्रीय बनवण्याकरिता लिबर्टी बरोबर भागीदारी केली. सध्याच्या काळात याच साच्याचा उपयोग विमा कंपन्या आरोग्य विम्यासाठी करतात. घरमालकाला स्वतःचे घर अधिक सुरक्षीत स्थळ बनविण्यासाठी त्याने योजलेल्या उपायांवर आधारित गृह विमा मात्र अशाप्रकारे कधीही नव्हता.

गोदरेज लॉक्स आणि लिबर्टी यांच्यातर्फे देण्यात येणारा विमा ग्राहकांचा विशेष हक्क आणि त्यांचा रस यावर आधारित दिला जाऊ शकेल. जर एखाद्या ग्राहकाला विमा योजना वाढवायची असेल तर ते थेट लिबर्टी जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडशी संपर्क साधू शकतात. गोदरेज लॉक्स आणि लिबर्टी इन्श्युरन्स यांच्यामधील हा सहयोग १५ नोव्हेंबर २०२१ पासून १४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत लागू राहील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!