टोयोटा किर्लोस्कर मोटरतर्फे ग्राहक-विक्रेत्यांसाठी फायनान्स सुविधा

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : ग्राहकांचा दृष्टिकोन लक्षात घेत, टोयोटा किर्लोस्कर मोटरने (टीकेएम) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदासोबत एक सामंजस्य करार केला आहे. जेणेकरून संपूर्ण भारतातील शहरातील आणि प्रदेशातील त्यांच्या ग्राहक आणि विक्रेत्यांसाठी फायनान्स सुविधा पर्याय उपलब्ध करून देता येईल.
करारानंतर बँक ऑफ बडोदा, टीकेएमद्वारे विकल्या गेलेल्या संपूर्ण श्रेणीतील वाहनांसाठी प्राथमिक फायनान्सर असेल. ही नवीन सेवा ग्राहकांना ९० टक्के हाय ऑन-रोड फंडिंग, ८४ महिन्यांपर्यंत दीर्घ परतफेड कालावधी, नो-प्रीपेमेंट किंवा पूर्वसूचना शुल्क यासारख्या सानुकूलित निराकरणांचा लाभ घेण्यास मदत करेल आणि दुसरीकडे, टीकेएमच्या व्यापाऱ्यांना स्पर्धात्मक व्याजदरासह सर्वोत्कृष्ट डिजिटलाइज्ड सप्लाई चेन फायनान्सचा फायदा होईल.
वित्तपुरवठ्यात येणार बळकटी
या भागीदारीबद्दल बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक मुरली रामास्वामी म्हणाले की, भारतातील प्रवासी कार उत्पादकांपैकी प्रमुख टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत भागीदारी करण्याबद्दल आम्हाला आनंद आहे. या भागीदारीमुळे आम्हाला ऑटोमोबाईल विक्रेत्यांसोबत आमचे संबंध अधिक मजबूत करण्याचे तसेच संपूर्ण देशातील आमच्या शाखांद्वारे आमचा डीलर फायनान्स पोर्टफोलिओचा विस्तार करण्याची संधी प्रदान करेल. या विक्रेत्यांमध्ये आमची इतर उत्पादने क्रॉस-विक्री करण्याची प्रचंड क्षमता पाहता, आम्हाला आशा आहे की, या करारामुळे पुरवठा साखळीच्या वित्तपुरवठ्यात आमची उपस्थिती बळकट केल्यामुळे परस्पर समन्वय साधला जाईल. तसेच बाजारपेठेत टीकेएमची मागणी वाढेल.
सामंजस्य कराराबद्दल समाधान
यावेळी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंह खिची म्हणाले की, ऑटो लोन फायनान्ससाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायवेट लिमिटेडसह सामंजस्य करार करण्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे. आमच्या ९ हजारपेक्षा जास्त शाखांच्या विस्तृत नेटवर्कसह आम्ही देशभरातील आमच्या ग्राहकांना वित्तपुरवठा करण्यास आणि ऑटो मार्केट शेअरमध्ये प्रवेश करण्यास सक्षम बनवू.
मागणीत वाढ, समाधानकारक प्रतिसाद
यावेळी टीकेएमचे विक्री व सेवा विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन सोनी म्हणाले की, हे असोसिएशन आमच्या ग्राहक तसेच विक्रेत्यांना न्यू एज बँकिंग आणि फायनान्स सोल्युशनचा सुलभ आणि निरंतर अनुभव प्रदान करण्यासाठी आहे. टोयोटा अर्बन क्रूझर सारख्या नवीन मॉडेलसह आमच्या अलीकडील धोरणासह बँक ऑफ बडोदा बरोबरचा सामंजस्य करार आमच्यासाठी योग्य वेळी आला आहे. आमच्या अर्बन क्रूजर तसेच ग्लांझाला मोठ्या तसेच लहान शहरात आणि प्रदेशमधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांची मागणीदेखील वाढली आहे.