एक किलो मिळणार की तीन किलो? कांद्याबाबत मंत्री गावडे म्हणतात…

एक नाही तीन किलोच कांदे मिळणार?

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : स्वस्त दरात कांदे देणार असल्याची घोषणा सरकारनं केली. तीन किलो कांदे देणार असं सुरुवातीला सांगितलं. पण सध्या जो आदेश काढण्यात आलाय, त्याबाबत संभ्रम आहे. सुरुवातीला एकच किलो कांदे देणार असल्याचं म्हटल्यानं लोक गोंधळून गेलेत.

व्हाट्सअपवर स्पष्टीकरण?

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री गोविंद गावडे सुधारीत आदेश जारी करणार आहेत. येत्या २४ तासांत हा आदेश निघेल, असं कळतंय. सुधारीत आदेशानुसार तीन किलो कांदेच लोकांना देण्यात येणार असल्याची शक्यताय.

त्यामुळे एक किलो नव्हे तर तीन किलो कांदेच लोकांना स्वस्त दराने दिले जातील अशी दिलासादायक शक्यता वर्तवली जाते आहे. एका व्हाॅट्सअप ग्रूपमध्ये गोविंद गावडे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं सांगितलं जातंय. तालुक्याप्रमाणे कांदा वाटप केलं जाणार असून महिना संपायच्या आत कांदा वाटप प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचंही कळतंय.

काय होता आधीचा आदेश?

राज्यात 50 मेट्रिक टन कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला रेशनकार्डावर प्रत्येकी 1 किलो कांदा दिला जाणार आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत रेशनकार्डावर 1 किलो कांद्याचे वाटप केले जाईल. 34 रुपये 50 पैसे प्रतिकिलो दराने कांद्याची विक्री केली जाईल.

बाजारात कांदा बराच महाग झाला आहे. चांगल्या दर्जाच्या कांद्याचा दर 80 रुपये प्रतिकिलो आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी रेशनकार्डावर 3 किलो कांदा 32 रुपये प्रतिकिलो दराने देण्याचा निर्णय सरकारने मागील आठवड्यात घेतला होता. 1,045 मेट्रिक टन कांदा ‘नाफेड’कडून घेण्याचा निर्णय झाला. सरकारने नाफेडला ऑर्डरही दिली आहे.

त्यापैकी 50 मेट्रिक टन कांदा राज्यात पोहोचला आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे संचालक सिद्धिविनायक नाईक यांनी दिली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!