‘अ‍ॅक्सिस बँक’च्या आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर

दुसऱ्या तिमाहीतील करोत्तर नफा ५३३० कोटी रुपयांवर, वार्षिक पातळीवर ७० टक्क्यांची वाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः अ‍ॅक्सिस बँक या भारताच्या खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाच्या बँकेने आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष २२ च्या तुलनेत बँकेला नफा झाला असून तो ३१३३ कोटी रुपयांवरून ५३३० कोटी रुपयांवर गेला आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) वार्षिक पातळीवर ३१ टक्क्यांनी, तर तिमाही पातळीवर १० टक्क्यांनी वाढले आहे. हे उत्पन्न आर्थिक वर्ष २२ च्या दुसऱ्या तिमाहीतील ९३८४ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत १०,३६० कोटी रुपयांवर गेले आहे.

निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) ३.९६ टक्क्यांवर

आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) ३.९६ टक्क्यांवर गेले असून ते वार्षिक पातळीवर ५७ बीपीएसनी आणि तिमाही पातळीवर ३६ बीपीएसनी वाढले आहे. क्यूएबी बेसिसवर कासा वार्षिक पातळीवर १३ टक्क्यांनी, तर तिमाही पातळीवर २ टक्क्यांनी वाढला आहे. कासा गुणोत्तर ४६ टक्क्यांवर गेले असून त्यात वार्षिक पातळीवर १७२ बीपीएसची वाढ झाली आहे. बँकेचे ऑपरेटिंग उत्पन्न आर्थिक वर्ष २२ च्या दुसऱ्या तिमाहीतील ११,६९९ कोटी रुपयांवरून २२ टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत १४,३०१ कोटी रुपयांवर गेले आहे.

एकूण एनपीए, निव्वळ एनपीए अनुक्रमे २.५० टक्के

३० सप्टेंबर २०२२ रोजी बँकेचा नोंदला गेलेला एकूण एनपीए आणि निव्वळ एनपीए अनुक्रमे २.५० टक्के आणि ०.५१ टक्के आहे. बँकेचे शुल्क उत्पन्न वार्षिक पातळीवर २० टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत ३८६२ कोटी रुपयांवर गेले आहे. रिटेल शुल्क वार्षिक पातळीवर २८ टक्क्यांनी वाढले आहे व त्याचा बँकेच्या एकूण उत्पन्नातील वाटा ६८ टक्के आहे. नफ्यासह एकूण कॅपिटल अ‍ॅडिक्वेसी रेशियो आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या सहामाहीत १७.७२ टक्के असून सीईटी १ रेशियो १५.१४ टक्के आहे.

हेही वाचाःशॅक्स मालकांना दिलासा; शॅक्स बेड, कचरा गोळा करण्याचे शुल्क कमी…

१२ महिन्यांत प्रत्येक विभागात लक्षणीय प्रगती

अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ चौधरी म्हणाले, ‘गेल्या १२ महिन्यांत आम्ही प्राधान्यक्रमानुसार प्रत्येक विभागात लक्षणीय प्रगती केली आहे. ग्राहकाभिमुखता आणि डिजिटायझेशनवर भर दिल्यामुळे आमच्या संपादनाला गती मिळाली. दमदार नफ्यामुळे सर्व व्यवसायातील मूळ ऑपरेटिंग नफा आणि मार्जिन्स वाढली आहेत. आम्ही ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवत दर्जेदार फ्रँचाईझी तयार करत आहोत. दरम्यान नेटवर्कचा विस्तार करण्यास आणि निमशहरी व ग्रामीण भागात सेवा पुरवून भारतातील संधींचा लाभ घेण्यावरही आमचा भर आहे. आम्ही अ‍ॅक्सिस बँकेच्या भविष्याविषयी सकारात्मक आहोत.’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!