TECHNO VARTA | Acerचा नवीन Predator Helios Neo 16 गेमिंग लॅपटॉप लॉंच; पहा आकर्षक स्पेसिफिकेशन्स

Acer ने Predator Helios लाइनअपमध्ये दोन नवीन लपटॉप्सचा समावेश केला आहे, पहा सविस्तर स्पेक्स

Goan Varta Live | प्रतिनिधी

गोंवन वार्ता लाईव्ह व्हेबडेस्क, 21 मे : टेक्नॉलॉजी क्षेत्रात दर महिन्यात नवीन युटीलिटीज येत असतात ज्या ग्राहकांच्या गरजेच्या अनुरूप असतात. गेम डव्हलपर्स, एडिटर्स, अनिमेटर्स, कोडर्स-प्रोग्रॅमर्स इत्यादि फॅक्टर्स कम्प्यूटिंग क्षेत्रात आपला प्रभाव वाढवत आहेत. याच कारणांमुळे क्रिएटर्सची एक वेगळी नवीन पिढी उभी राहत आहे. अनेमेशन असो किंवा AI सगळ्याचे कंटेंट पाहणारा एक प्रवर्ग आहे, त्यामुळे कंटेंट क्रीएशन एक करियर ऑप्शन म्हणून सुद्धा चोखळला जातोय.

The five best jobs for gamers

गेल्या काही वर्षात E-SPORTS एक महत्वाचे सेक्टर म्हणून नावारूपास येत आहे. मल्टी-नेशनल कंपन्या आपला पैसा या क्षेत्रात अक्षरशः ओततात. अब्जावधीचा व्यवहार चालतो. AAA गेमिंग टायटल्स नवीन गेम्स ड्रॉप करीत असतात. पुढील सप्टेंबर पर्यन्त रॉकस्टार स्टुडिओ आपल्या प्रथितयश GTA ( grand theft auto) या लाईनअप मधील 6 वे संस्करण GTA VI लॉंच करेल. एकंदरीत पुढील काही महिन्यात E-SPORT सेक्टरला सुगीचे दिवस येणार आहेत.

GTA 6 Leak: GTA 6 Set in Modern Day - WhatIfGaming

याच भविष्यातील संधि कॅश करण्यासाठी गेमर्सना आकर्षित करत पीसी मेकर एसरने प्रीडेटर हेलिओस लाइनअपमध्ये दोन नवीन लपटॉप्स सादर केले आहेत. कंपनीच्या मते, Acer Predator Helios Neo 16 मध्ये 13th Gen Intel Core i5 आणि i7 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce RTX 4050 आणि 4060 सीरीज GPU ने सुसज्ज आहे. यात 16 इंचाचा डिस्प्ले आहे जो 165Hz उच्च रिफ्रेश रेटसह येतो.

Acer Predator Helios Neo 16 PHN16-71 Intel Core i7-13700HX 16 Inches Gaming  Laptop (16GB/1TB SSD/Windows 11/Black/2.6 Kg)​ Online at Best Prices in  India | Shop.GadgetsNow

Acer Predator Helios Neo 16 किंमत

नवीन Acer Predator Helios Neo 16 ची किंमत रु. 1,09,990 पासून सुरू होते आणि कंपनीच्या विशेष स्टोअर्स, ऑनलाइन स्टोअर्स आणि Flipkart आणि Amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. ते विजय सेल्स आणि क्रोमा वरून ऑफलाइन खरेदी केले जाऊ शकते.

Acer Introduces Predator Triton 17 X and Predator Helios Neo 16 Gaming  Laptops - Iconic MNL

Acer Predator Helios Neo 16 वैशिष्ट्ये

डिझाइन:

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, Acer Predator Helios Neo 16 अतिशय स्लिम बेझल्ससह येतो आणि त्यात अॅल्युमिनियम चेसिस आहे, जे क्रिप्टिक डिझाइन लुक देते. याला सायबरडेक म्हणतात. यात आधीपासून तयार केलेला वेबकॅम आणि 4-झोन RGB कीबोर्ड आहे.

Acer Predator Helios Neo 16 review | High Performance Laptops

डिस्प्ले :

लॅपटॉपचा डिस्प्ले 16-इंचाचा WQXGA पॅनेल आहे जो 165Hz उच्च रिफ्रेश दर आणि 500 ​​nits ब्राइटनेससह येतो.

16 inch Acer Predator TRITON WQXGA 240Hz Display Intel 14-Core i9-12900H  GeForce RTX 3080

प्रोसेसर:

लॅपटॉपमध्ये 13th Gen Core i7 प्रोसेसर आहे जो NVIDIA RTX 4060 GPU ऑनबोर्डसह येतो.

ASUS TUF गेमिंग NVIDIA GeForce RTX 3070 Ti OC pci_e_x16 संस्करण ग्राफिक्स  कार्ड (PCIe 4.0, 8GB GDDR6X, HDMI 2.1, DisplayPort 1.4a, दोहरी गेंद फैन  बियरिंग्स, सैन्य-ग्रेड प्रमाणन, GPU Tweak ...

OS:

हा लॅपटॉप विंडोज ११ वर चालतो.

बॅटरी:

यात 90Wh ची बॅटरी आहे.

कनेक्टिव्हिटी:

कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात थंडरबोल्ट पोर्ट, USB 3.2 पोर्ट आणि WiFi-6 आहे.

16 inch Acer Predator TRITON WQXGA 240Hz Display Intel 14-Core i9-12900H  GeForce RTX 3080

अलीकडच्या काळात, PC ब्रँडने Acer Swift Go, Predator Triton 17X, Helios Neo 16, Swift X 16, Acer Predator Helios 16 आणि इतर अनेक लॅपटॉप लॉन्च केले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!