PF खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर भरावा लागणार कर; सरकारचे नवीन नियम

पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळे खाते उघडले जाईल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः केंद्र सरकारने नवीन आयकर नियमावली अधिसूचित केली आहे ज्या अंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाती (पीएफ) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळं खातं उघडलं जाईल.

हेही वाचाः 40 टक्के भारतीयांचं आयुष्य 9 वर्षांनी कमी होऊ शकतं; महाराष्ट्रासाठी परिस्थिती चिंताजनक

नवीन अधिसूचनेनंतर, सर्व कर्मचारी भविष्य निधी खाती करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जातील. सीबीडीटी अधिसूचनेनुसार ३१ मार्च २०२१ पर्यंत कोणत्याही योगदानावर कोणताही कर लावला जाणार नाही, परंतु २०२०-२१ आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारं व्याज करपात्र असेल आणि त्याची स्वतंत्र गणना केली जाईल. पीएफ खात्यात २०२१-२२ आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये वेगवेगळी खाती असतील.

नवीन नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू

सीबीडीटीने आपल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की नवीन नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील, परंतु २०२१-२२ आर्थिक वर्षापर्यंत, जर तुमच्या खात्यात वार्षिक ठेव २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर मिळणारं व्याज करपात्र असेल. आणि त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. लोकांना पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्रात या व्याजाची माहिती द्यावी लागेल.

हेही वाचाः राज्यात भाजप सरकारचे दिवस भरले; २०२२ मध्ये काँग्रेस सरकार स्थापणारः कामत

यापूर्वी देखील २०१६ मध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होत्या. त्यानंतर या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तो प्रस्ताव मागे घेतला होता. लोकसभेमध्ये निवेदन करून त्यांनी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं. विविध कर्मचारी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता.

हा व्हिडिओ पहाः VIOLENCE AGAINST WOMEN | महिन्याकाठी महिलांवरील अत्याचाराच्या 20 घटना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!