मजबूत आर्थिक प्रतिकारशक्ती अनिश्चित काळातील सुरक्षिततेची गुरुकिल्ली

शारीरिक, भावनिक, आर्थिक स्तरावरील सुरक्षितता मार्ग शोधणं आवश्यक - रवि कृष्णमूर्ति, प्रेसिडेंट-जोन 1, एसबीआय

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः नजीकच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या महामारीला आपण सगळेच जण तोंड देत आहोत. मानवजातीवर आलेल्या या अभूतपूर्व संकटामुळे लोकांमध्ये काळजी व तणाव वाढला आहे. या संकटाने आपल्या सर्वांचेच डोळे उघडलेत. आयुष्याची नजाकत आपल्या लक्षात येत आहे. या संकटाने आपल्या सर्वांनाच आरोग्य, वित्त आणि जीवनशैलीबद्दलचे निर्णय नव्याने तपासण्यास असहाय्य केलं आहे.

मजबूत आर्थिक प्रतिकारशक्ती करण्यासाठी आवश्यक पावलं

आरोग्य आणि जीवनाकडे बघण्याच्या ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल होत असल्याचं दिसून येत आहे. आज ग्राहक शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत आहेत आणि म्हणूनच त्यांची प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या उत्पादनांवर खर्च करण्याची त्यांची तयारीही जास्त आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार मधासारख्या उत्पादनाची मागणी 35 टक्क्यांनी वाढली आहे, तर च्यवनप्राशच्या मागणीत 18 टक्के आणि हळदीच्या मागणीत 38 टक्क्यांची वाढ झाली आहे. कारण ही उत्पादने प्रतिकारशक्ती वाढवणारी आहेत. शारीरिक प्रतिकारशक्तीची अशाप्रकारे काळजी घेतली जात असताना आपण सध्याच्या अनिश्चित काळात मजबूत आर्थिक प्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी आवश्यक पावलं उचलणंही गरजेचं नाही का?

आर्थिक सुरक्षाही धोक्यात

या महामारीमुळे आपली शारीरिक सुरक्षा धोक्यात आली तशी आर्थिक सुरक्षाही धोक्यात आली आहे. व्यवसायांवर झालेला परिणाम आणि वाढलेली बेरोजगारी ही आपल्या सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा आहे, विशेषतः ज्यांनी यापूर्वी आर्थिक प्रतिकारशक्ती वाढवण्याचा पर्याय गृहीत धरला नव्हता, त्यांच्यासाठी!

आर्थिक पोर्टफोलिओचं पुनरावलोकन

कोविड केसेस वाढत असतानाच लोकांनी अशा कठीण काळात सुरक्षित राहाण्यासाठी आर्थिक पोर्टफोलिओचं पुनरावलोकन सुरू केलं आहे. त्यांनी अद्याप तसं केलेलं नाही, त्यांनी आता मजबूत आर्थिक प्रतिकारशक्ती उभारण्यासाठी काम करायला सुरुवात करायला हवी. आपण काळाची पावलं ओळखून प्रियजनांना शारीरिक, भावनिक आणि आर्थिक स्तरावर सुरक्षित ठेवण्याचे मार्ग शोधायला सुरुवात केली पाहिजे.

आरोग्य व जीवनाशी संबंधित प्रतिकारशक्ती उभारण्याचं ध्येय पूर्ण करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

बदलाप्रती बांधिलकी

आजचं वातावरण अनिश्चिततेने भारलेलं आहे आणि कदाचित ते बरोबर आहे. कारण आपली शारीरिक व आर्थइक प्रतिकारशक्ती काडीच्या आधाराने तग धरून आहे. आपली शारीरिक प्रतिकारशक्ती मजबूत राहावी यासाठी मास्क घालणं, सॅनिटायझर सोबत ठेवणं अशाप्रकारची न्यू नॉर्मल परिस्थिती आपण ज्याप्रमाणे स्वीकारली आहे, त्याचप्रमाणे आपण बदलती आर्थिक स्वीकारली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक संरक्षण करण्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजेत. हे केवळ बदलाची संकल्पना स्वीकारून तिचा आपल्या रोजच्या आयुष्यात ठाम प्रवेश केल्यावर शक्य होईल. कारण म्हणतात ना, केवळ बदल हा निश्चित असतो.

आर्थिक पोर्टफोलिओ उभारणीवर लक्ष केंद्रित करा

आर्थिक पोर्टफोलिओ मजबूत करणं ही काळाची गरज आहे. यामुळे आजच्यासारख्या आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक काळात पाठिंबा मिळेलच, शिवाय त्याबरोबर मानसिक शांतीही मिळेल. कोणत्याही आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अशा अवघड परिस्थितीत कामी असा सर्वसमावेशक आरोग्य विमा असणं आवश्यक आहे. यामुळे जीवनध्येये साकार करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो व त्याचबरोबर अवघड काळात स्वतःसाठी आणि प्रियजनांसाठी जास्तीत जास्त सुरक्षा मिळते.

तुमच्या जीवन विम्याला इनबिल्ट क्रिटिकल इलनेस (सीआय) कवचाची जोड द्या

जर या महामारीने आपण कुठला धडा शिकला असो, तर तो म्हणजे तात्पुरत्या समस्यांचा विचार न करता पुढचा विचार करणं. तसं करताना सध्याच्या परिस्थितीत गंभीर आजार ही सर्वात मोठी समस्या झाली आहे. भारतातील तीनपैकी एक जण जीवनशैलीविषयक गंभीर आजाराचा शिकार ठरत आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक गोष्ट वरखाली होत असताना पूर्ण माहितीनिशी आर्थिक निवड करणं महत्त्वाचं आहे तसंच इन- बिल्ट क्रिटिकल इलनेस कवचासह जीवन विमा घेणं आवश्यक आहे, ज्यामुळे जीवन किंवा आरोग्याशी निगडीत अनिश्चित काळात त्याचा चांगला उपयोग होईल.

कुटुंबाला तुमच्या आर्थिक पोर्टफोलिओची माहिती देणं

अहवाल असे सांगातात, की भारतातील 43 टक्के स्त्रियांना त्यांच्या नवऱ्याच्या आर्थिक बाजूंची माहिती नसते. या महामारीमुळे संकटं कशाप्रकारे पूर्वसुचनेशिवाय येतात हे ठळकपणे समजलं असून ते लक्षात घेता कोणतीही दुर्देवी घटना घडल्यास कुटुंबाला तुमच्या आर्थिक बाजूची माहिती असणं आवश्यक आहे. आधीच अवघड परिस्थितीतून जात असलेल्या कुटुंबाला अचानकपणे एकट्याने सर्व जबाबदारींचं ओझं पेलवणं हे खूप त्रासदायक असू शकतं आणि म्हणूनच अशा परिस्थितीत त्यांनी योग्य वेळेत सर्व माहिती देऊन ठेवणं प्रतिबंधात्मक उपाय ठरेल. तुमच्या कुटुंबाला विमा योजना, बँक खात्याचे तपशील, म्युच्युअल फंड्स आणि इतर गुंतवणुकींची माहिती देऊन ठेवा.

सध्याच्या परिस्थितीत आपल्या जीवनशैलीमध्ये मोठे बदल करण्याची गरज आहे, ज्यामुळे आपल्याला स्वतःचं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर संरक्षण करता येईल. आपण दमदार शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काम करतच आहोत, त्याबरोबर आर्थिक प्रतिकारशक्ती बळकट करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आजच्या अनिश्चित काळात रक्षण करा. यामुळे जास्त चांगल्या प्रकारे ठराविक जोखीम घेता येईल आणि ही प्रतिकारशक्ती तुम्ही जितक्या लवकर तयार कराल, तितके उतारवयात मोठ्या आर्थिक जबाबदारी हाताळणं सोपं जातं. तुमच्या शारीरिक व मानसिक प्रतिकारशक्तीसाठी तुमचं आर्थिक स्वास्थ्य अतिशय महत्त्वाचे आहे. कारण अशाप्रकारच्या अवघड काळात काही समस्या उद्भवल्यास तुमच्यात अवघड काळात तरून जाण्यासाठी आधार असेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!