भारत आणि आशिया पॅसिफिक प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची स्टेलॅन्टिसकडून घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ‘स्टेलॅन्टिस इंडिया अँड एशिया पॅसिफिक’तर्फे तिच्या भारत आणि परिसरातील कामकाजासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुका आज जाहीर करण्यात आल्या. भारतात ‘स्टेलॅन्टिस’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक या पदांवर रोलँड बुशाहा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे ‘जीप’ आणि ‘सिट्रोएन’च्या राष्ट्रीय विक्री कंपन्यांची (एनएससी), तसेच समुहाच्या उत्पादनाच्या कामकाजाची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

मजबूत आणि वैविध्यपूर्ण अनुभव

रोलॅंड यांनी सिट्रोएन इंडिया’च्या सेल्स व मार्केटिंग या विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने या ब्रॅंडचे कामकाज 2017पासून यशस्वीपणे सांभाळले आहे. सिट्रोएन हा ब्रँड आणि ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस’ ही नवीन गाडी यांचे भारतात नुकतेच सादरीकरण झाले. त्याची संपूर्ण अंमलबजावणी रोलॅंड यांनी केलेली आहे. आंतरराष्ट्रीय वाहन उद्योग आणि सल्लामसलत या व्यवसायात रोलँड यांचा मजबूत आणि वैविध्यपूर्ण अनुभव आहे. 2017 मध्ये ‘ग्रुप पीएसए’मध्ये प्रवेश करण्यापूर्वी, रोलँड यांनी ‘रेनॉ’ येथे अनेक महत्त्वाची पदे भूषविली. यामध्ये, मॅनेजिंग डायरेक्टर यूके, यूरोप एनएससीचे प्रमुख (जर्मनी, यूके, स्पेन व इटली) आणि एसव्हीपी सेल्स अँड मार्केटिंग (आशिया पॅसिफिक व चीन) या पदांचा समावेश होता.

डॉ. पार्थ दत्ता ‘आर अँड डी’च्या कार्यवाहीची जबाबदारी

डॉ. पार्थ दत्ता यांच्याकडे भारत व आशिया पॅसिफिक विभागातील अभियांत्रिकी, डिझाईन, संशोधन आणि विकास (आर अँड डी) यांच्या कार्यवाहीची जबाबदारी देण्यात आली आहे. पार्थ यांनी ‘एफसीए इंडिया’चे प्रेसिडेंट व व्यवस्थापकीय संचालक या पदांवर 2019पासून काम केले आहे. नवीन ‘जीप कम्पास’ आणि स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यात आलेली ‘जीप रॅंगलर’ यांच्या यशस्वी सादरीकरणात त्यांचा मोलाचा वाटा होता.  पार्थ यांनी ‘एफसीए’मध्ये अभियंता म्हणून 1999मध्ये प्रवेश केला. गेल्या वीस वर्षांमध्ये त्यांनी तेथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक व व्यावसायिक कामकाज, प्रशासन, व्यवसाय विकास प्रकल्प, अभियांत्रिकी आणि वाहन जुळणी या विभागांत वरिष्ठ पातळीवर काम केले. ‘एफसीए’मधील कार्यकाळात पार्थ हे चेन्नई आणि पुणे येथील तांत्रिक केंद्रांचे संचालक तसेच चीनमधील उत्पादन अभियांत्रिकी विभागाचे प्रमुखही होते.

‘स्टेलॅन्टिस इंडिया अँड एशिया पॅसिफिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्ल स्माइलींनी केली नियुक्त्यांची घोषणा

रोलँड आणि पार्थ यांच्या स्टेलॅन्टिसमधील जबाबदाऱ्यांची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आंतरराष्ट्रीय विक्री व विपणन अधिकारी म्हणून यशस्वी ठरलेले रोलँड हे भारतात मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक या नवीन भूमिकेमध्ये आपला व्यावसायिक अनुभव उपयोगात आणतील. कंपनीच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठ जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने, ‘स्टेलॅन्टिस’चा ब्रँड, नेटवर्क आणि व्यावसायिक कामकाज यांचा भारतात विकास व विस्तार करण्याची जबाबदारी रोलॅंड यांच्यावर असणार आहे. पार्थ यांच्याकडे नावीन्यता आणि उत्पादन विकास यांचा व्यापक अनुभव आहे. त्या दृष्टीने ‘स्टेलॅन्टिस’च्या अभियांत्रिकी, डिझाइन आणि संशोधन व विकास या विभागांचे नेतृत्व करण्यास पार्थ हे आदर्श उमेदवार आहेत. ‘जीप’ या ब्रँडची स्थानिक उत्पादन योजना भारतामध्ये वितरीत करण्यात पार्थ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्या अनुषंगाने, स्थानिक उत्पादनाची रणनीती आखण्यासाठी नेमलेल्या संघाचे नेतृत्व पार्थ करतील आणि विकासासाठी नवीन संधीही शोधून काढतील,” असं स्माइली म्हणाले.

रोलँड आणि पार्थ हे दोघेही आपापल्या नवीन पदांवर त्वरीत रुजू झाले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!