एल अँड टी- सुफिन उद्योजकांना सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक बीटुबी ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म…

80 वर्षांचा समृद्ध अनुभव आणि देशाचा विश्वास ही मुख्य बलस्थाने

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : लार्सन अँड टुब्रो या ईपीसी प्रकल्प, उच्च- तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीने एल अँड टी- सुफिन हा सर्वसमावेशक ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म बीटुबी औद्योगिक उत्पादने आणि सेवांसाठी लाँच केला आहे.

80 वर्षांचा समृद्ध अनुभव आणि देशाचा विश्वास ही मुख्य बलस्थाने

गेल्या 80 वर्षांचा समृद्ध अनुभव आणि देशाचा विश्वास ही मुख्य बलस्थाने असलेल्या एल अँड टीचा हा बीटुबी ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म व्यवसायांना विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) सक्षम करण्यासाठी व त्यांना आपला औद्योगिक पुरवठा संपूर्ण भारतातून डिजिटल आणि किफायतशीर पद्धतीने मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. भारतीय उत्पादन यंत्रणा औद्योगिक पुरवठा साखळीत लक्षणीय अकार्यक्षमतेचा सामना करत असून त्यामुळे त्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या गरजा पुरवण्यासाठी डिजिटल किंवा इतर बीटुबी डिरेक्टरीजसारख्या स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागते. पारंपरिक पुरवठा साखळीतील या समस्यांचे व्यवसायातील सातत्य, उत्पन्न किंवा इनव्हेंटरी आणि मनुष्यबळाच्या वापरासारख्या क्षेत्रांत मोठ्या आव्हानांमध्ये रुपांतर झाले आहे.

दुसरे मोठे पाऊल

डिजिटल तंत्रज्ञान केंद्रस्थानी असलेले एल अँड टी – सुफिन भारतीय व्यवसायाचे चित्र पालटण्यासाठी सज्ज असून त्यामुळे पारंपरिक पुरवठा साखळ्यांना औपचारिक स्वरूप येईल व पुरवठादार तसेच खरेदीदार या दोघांसाठी लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. अधिक चांगली पारदर्शकता आणि विस्तृत बाजारपेठ पुरवण्यासाठी तयार करण्यात आलेले एल अँड टी- सुफिन हे, गेल्या वर्षी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानविषयक ज्ञानाला चालना देण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या शिक्षण प्लॅटफॉर्मनंतरचे, एल अँड टीच्या डिजिटल सेवांचा विस्तार करणारे दुसरे मोठे पाऊल आहे.

डिजिटल स्थित्यंतराच्या प्रवासात आणखी मोठी झेप

एल अँड टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. एसएन सुब्र्हमण्यन (एसएनएस) म्हणाले, ‘भारत 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर असताना एकंदर भारतीय उद्योगांची विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची जागतिक स्पर्धात्मकता उंचावण्यासाठी पुरवठा साखळ्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी खूप गरज आहे. एल अँड टी –सुफिनच्या लाँचसह आम्ही डिजिटल स्थित्यंतराच्या प्रवासात आणखी मोठी झेप घेतली असून हा प्लॅटफॉर्म विश्वासाचा वारसा आणि यंत्रणेच्या सखोल आकलनाच्या जोरावर तयार करण्यात आला आहे.’ ‘एल अँड टी –सुफिन’ औद्योगिक उत्पादनांसाठी बीटुबी बाजारपेठेचे रूपांतर करेल असा आम्हाला विश्वास वाटतो. हा प्लॅटफॉर्म सहजपणे उपलब्ध, सोयीस्कर आणि पारदर्शक, विशेषतः दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांसाठी सुलभ करण्यात आला असून पर्यायाने समान कार्यक्षेत्रासह व्यवसायांच्या विकासासाठी सर्वसमावेशक करण्यात आला आहे.’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!