व्हिस्की चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ओकस्मिथ® व्हिस्कीचे गोव्यात पदार्पण

आंतरराष्ट्रीय ब्लेंड असलेल्या आणि बिम सनटोरीने उत्पादित केली आहे ओकस्मिथ®

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : व्हिस्की चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. व्हिस्कीचा एक नवा प्रकार गोव्यात लॉन्च करण्यात आला आहे. ओकस्मिथ® ही प्रीमियम भारतीय व्हिस्की असून सनटोरीचे प्रमुख ब्लेंडेर शिंजी फुकुयो यांनी बनवली आहे. फुकुयो यांनी याआधी हिबिकि® आणि यामाझाकी® सारख्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्हिस्की बनवल्या आहेत. चांगल्या दर्जाचे स्कॉच माल्ट , स्मूथ अमेरिकन बरबन्सचे मिश्रण आणि जापनीज पद्धतीने करण्यात येणाऱ्या ब्लेंडिंगमुळे ओकस्मिथ® भन्नाट बनली आहे. पूर्व आणि पश्चिमेचे हे मिश्रण आता भारतीय ग्राहकांना चाखायला मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रीमियम दर्जाचे मद्य बनविणाऱ्या बिम सनटोरीने कंपनीने भारतात बनलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ओकस्मिथ® व्हिस्कीचे गोव्यात लॉंचिंग केलंय. कंपनीने भारतातून २०३० पर्यंत १ दशलक्ष अमेरिकन डॉलर महसूल गोळा करण्यासाठी धोरण आखलेंय. हे लॉंचिंग त्यातीलच एक भाग आहे. डिसेंबर २०१९ मध्ये ओकस्मिथ® व्हिस्कीचे महाराष्ट्र आणि तेलंगणात यशस्वी पदार्पण झालं होतं. तर मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विस्तार वाढवला होता. गोव्यात ही व्हिस्की ओकस्मिथ® गोल्ड आणि ओकस्मिथ® इंटरनॅशनल या दोन प्रकारात उपलब्ध असणार आहे. भारतात लाँच झाल्यावर अगदी काही महिन्यातच या ब्रँडच्या एक लाख उत्पादनांची विक्री झाली आहे.

ओकस्मिथ ही जगप्रसिद्ध ब्लेंडर आणि सनटोरीचे प्रमुख ब्लेंडेर शिंजी फुकुयो यांनी बनवली आहे. हे जगप्रसिद्ध ब्लेंडर शिन्जी फुक्यूयो, चीफ ब्लेंडर, संटोरी यांनी तयार केलंय. पारंपारिक जपानी कौशल्यांचा वापर करून, उत्कृष्ट दर्जाचे स्कॉच माल्ट व्हिस्की आणि स्मूथ अमेरिकन बॉर्नबॉन्सला यांचं भन्नाट मिश्रण करून तयार करण्यात आलेली ही व्हिस्की भारतीय चवीसाठी अगदी अद्वितीय आणि अत्यंत अस्सल आहे. ही व्हिस्की बियापासून ते सिप घेईपर्यंत अशा सूक्ष्म पध्दतीने तयार केली आहे की हे स्पिरिट नाकाला संपन्न भासेल. त्याचवेळी चवीला देखील स्मूथ, संतुलित असणारी ही विस्की जास्त काळ टिकणारी आहे. भारतात ओकस्मिथ® गोल्ड आणि ओकस्मिथ® इंटरनॅशनल लॉन्च करणे हा बिम सनटोरी कंपनीच्या विस्तार नितीमधील एक भाग आहे. यावरून ग्लोबल स्पिरिट कंपनीसाठी भारताचे महत्व किती जास्त आहे हे लक्षात येते.

याविषयी माहिती देताना बिम सनटोरी, भारताचे व्यवस्थापकीय संचालक नीरज कुमार म्हणाले की,

डिसेंबर २०१९ मध्ये लॉन्च केल्यानंतर ग्राहकांनी ओकस्मिथ®ला भरघोस प्रतिसाद दिला. हे पाहून आम्ही उत्साहित झालो. भारतातील मद्यप्रेमींमध्ये ओकस्मिथ®ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय बाजारात प्रीमियम मद्य तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच चांगल्या पद्धतीने बनवलेल्या मद्याला लोकप्रियताही मिळत आहे. म्हणून ब्रँडचा विस्तार करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे. गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथे देशी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. देशातील सर्वाधिक पाहिले गेलेले पर्यटनस्थळ असल्याने येथे आम्हाला प्रीमियम दर्जाच्या मद्याचा व्यवसाय वाढण्याची शक्यता वाटतेय. त्यामुळे हा ब्रँड गोव्यातही लॉन्च करण्यात आला आहे.

किती आहे किंमत?

गोव्यात ओकस्मिथ® गोल्ड आणि ओकस्मिथ® इंटरनॅशनलच्या ७५० मिली बाटलीची किंमत अनुक्रमे ६३० रुपये व ३३५ रुपये असेल. ब्लेंडचा आंतरराष्ट्रीय दर्जा आणि बनविण्याची कारागिरी यामुळे या दोन्ही व्हिस्की या आपापल्या गटात प्रीमियम दर्जामध्ये येतात. बिम सनटोरी विषयी प्रीमियम दर्जाच्या मद्यामध्ये जगात अग्रणी असणाऱ्या बिम सनटोरी हे मानवी संबंधांना प्रेरणा देते.

जगभरातील ग्राहकांमध्ये कंपनीची विविध उत्पादनं लोकप्रिय आहेत. यामध्ये जिम बिम व मेकर्स मार्क हे बर्बन ब्रँड ,सनटोरी व्हिस्की काकूबिन व कोरव्हाईजेर कोनिएक ,नॉब क्रिक, बॅसिल हायडेन्स,लेगेंट बर्बन ; यामाझाकी, हाकुशु, हिबिकि,टॉकी जापनीज व्हिस्की ; टीचर्स ,लाफ्रॉएग आणि बोवमोर इंटरनॅशनल व्हिस्की, हॉर्निटोस आणि सौझा टकीला ; इएफएफइएन , हाकू आणि पिनॅकल व्होडका ; सिपस्मिथ आणि रोकू जीन ; आणि मिडोरी लिकर यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये जगात बर्बन आणि जापनीज व्हिस्कीमध्ये अग्रणी असलेल्या दोन कंपन्यांना एकत्र करून बिम सनटोरी ही कंपनी स्थापन करण्यात आली.

नवीन कंपनीकडे जुना वारसा , दर्जेदार उत्पादन बनवण्याची जिद्द , नाविन्यपूर्ण मद्य आणि चांगल्या कामासाठी विस्तार करण्याची दूरदृष्टी आहे. बिम सनटोरीचे मुख्यालय जपान येथे असून जपानस्थित सनटोरी होल्डिंगज लिमिटेडची साहाय्याक कंपनी आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!