नवरात्री Special | पाय नसणारी अंजना जेव्हा कुटुंब चालवते

नवरात्रीनिमित्त खास अशा काही महिलांच्या स्टोरी, ज्या फक्त इन्स्पिरेशनलच नाही, तर होपफुलही आहेत.

Goan Varta Live | प्रतिनिधी

हर्षदा परब : तिचे पाय हलत नाहीत म्हणून तिला शिवणाची मशीन चालवता येणार नाही असं टेलरिंग क्लासच्या शिक्षकांना वाटायचं. तिचं ऍडमिशन बदलून फॅशन डिझायनिंगच्या क्लासमध्ये तिचं नाव घातलं. पण अंजना दीड-दोन महिने शिवण क्लासच्या बाहेर बसली. शेवटी एक शिक्षकाने तिला शिलाई मशीन शिकवण्याचा निर्णय घेतलाच. फॅशनेबल ब्लाऊज शिवणं ही अंजनाची खासियत. कधीकाळी वडिलांना डॉक्टरकडे नेताना रिक्षावाल्याला द्यायला तिच्याकडे 9 रुपये नव्हते आज ती स्वत:चा खर्च आणि सात जणांचं कुटूंब चालवते. अंजनाला चालता येत नाही पण ती तिच्या जिद्दीने तिचं कुटूंब चालवते. नक्की ऐका अंजनाची गोष्ट.

पाहा व्हिडीओ –

(हर्षदा परब या मुक्त पत्रकार असून स्टोरीवाली दीदी नावाचं यूट्यूब चॅनेल चालवतात.)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!