टाटाच्या ‘या’ कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात वधारले

नीलाचल इस्पात निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी टाटा स्टीलने विकत घेतली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भारतातील एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून टाटा ग्रुपकडे पाहिले जाते. टाटा समूहाचा प्रचंड मोठा व्याप असून, तो अनेक देशात पसरलेला आहे. ऑटोमोबाइलपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेकविध क्षेत्रात टाटा समूहाच्या विविध कंपन्या कार्यरत आहेत. टाटा ग्रुपने आतापर्यंत अनेक कंपन्यांचे अधिग्रहण केल्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांना नवसंजीवनी दिली आहे. यात आणखी एका कंपनीची भर पडली आहे.

गेले जवळपास २ वर्षे बंद असलेली कंपनी टाटाने घेतली, आणि….

गेले जवळपास २ वर्षे बंद असलेली कंपनी टाटाने घेतली आणि ती आता कार्यरत होत आहे. टाटा समूहाच्या हाती विक्री झाल्यानंतर २०२० मध्ये म्हणजेच जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेल्या नीलाचल इस्पात निगम लिमिटेड या सरकारी कंपनीमध्ये कामकाज पुन्हा सुरु झाले आहे. टाटा समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, ओडिशा-आधारित नीलाचल इस्पात निगम लिमिटेडने टाटा स्टीलच्या उपकंपनीने १२ हजार कोटी रुपयांत संपादन केल्यानंतर जवळपास ९० दिवसांनी कामकाज सुरू केले आहे. नीलाचल इस्पात निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी टाटा स्टीलने तिच्या उपकंपनी टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्समार्फत अलीकडेच विकत घेतली. या वर्षी जानेवारीमध्ये १२ हजार कोटी रुपयांमध्ये हा करार झाला होता.

हेही वाचाःPhoto Story | मदुराई, तामिळनाडू येथे गोवा@60 रोड शोची झलक…

कंपनी पुढील १२ महिन्यांत स्थापित क्षमता गाठेल

पुढील १२ महिन्यांत स्थापित क्षमता गाठेल ही कंपनी ३० मार्च २०२० पासून बंद आहे. कंपनीच्या अधिग्रहणाच्या वेळी टाटांनी ऑक्टोबरमध्ये आपले कामकाज सुरू करेल असे सांगण्यात आले. कंपनी पुढील १२ महिन्यांत स्थापित क्षमता गाठेल अशी अपेक्षा आहे. टाटा स्टील देखील NINL ची क्षमता पाच दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी पावले उचलत आहे.

हेही वाचाःआताच्या काळात डिजिटल माध्यम प्रभावी अन् सर्वांच्या सोयीचे…

नीलाचल इस्पात निगम लिमिटेड टाटाने घेतली विकत

नीलाचल इस्पात निगम लिमिटेड हे टाटा स्टीलने त्यांच्या उपकंपनी टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्सद्वारे विकत घेतले आहे. NINL च्या कामकाजाच्या बातम्यांनंतर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारात दोन टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. हा शेअर २ रुपयांपेक्षा जास्त वाढून १००.५० रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या पाच दिवसांबद्दल बोलायचे झाले तर शेअरमध्ये ३.६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता येत्या काही दिवसांत तो १३० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. वार्षिक दहा दशलक्ष टन क्षमतेच्या ओडिशा-आधारित स्टील प्लांटचे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, टाटा स्टीलने म्हटले आहे की २०३० पर्यंत NINL ची क्षमता वार्षिक १० दशलक्ष टनांपर्यंत वाढवायची आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!