अब तक 56! सेन्सेक्स 56 हजाराच्या पार, शेअर बाजारात नवा विक्रम

महामारीनंतर आता पुन्हा तेजी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : शेअर बाजारानं आज नवा विक्रम नोंदवलाय. ऐतिहासिक नोंद करत शेअर बाजारानं 56 हजाराचा टप्पा बुधवारी ओलांडलाय. बुधवारी सकाळी साडे 9 वाजेपर्यंत सेन्सेक्स 294 अकांनी वधारला होता. यामुळे शेअर बाजार 56.086.50वर पोहोचलाय. आतापर्यंतचा हा सगळ्यात उच्चांकी आकडा शेअर बाजारानं गाठला.

विशेष म्हणजे निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. सकाळी बाजार उघडताच निफ्टीही 77 अंकांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे 16 हजार 697.95 वर निफ्टी पोहोचल्याची नोंद करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठा फटका बसलेल्या शेअर बाजाराला आता पुन्हा तेजी आली आहे. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण बुधवार सकाळपासूनच दिसून आलंय.

हेही वाचा – उत्तराखंडमध्ये आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला, गोव्यात कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब?

share 800X450

चढ-उतारांनंतर तेजी

दरम्यान, मंगळवारी दिवसभराच्या चढ-उतारादरम्यान अखेरच्या तासामध्ये झालेल्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार सकारात्मक वाढीसह बंद झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ५५,८५४.८८ अंकाच्या पातळीपर्यंत तर निफ्टीने १६,६२८.५५ अंकाच्या विक्रमी पातळीपर्यंत उसळी घेतली होती. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स २०९.६९ अंकाच्या वाढीसह ५५,७९२.२७ पातळीवर तर निफ्टी ५१.५५ अंकाच्या वाढीसह पहिल्यांदाच १६,६१४.६० या पातळीवर बंद झाला.

हेही वाचा – खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार

मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० प्रमुख शेअरपैकी २० शेअर वाढीसह तर १० शेअर लाल निशानीवर बंद झाले होते. यामध्ये टेक महिंद्राचे शेअर ३.२१ टक्के तर टीसीएसचे शेअर २.३२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये १.८३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. राष्ट्रीय शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील निर्देशांकात २.५७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.

हेही वाचा – भारतीय संघाचं ‘टी 20’ विश्वचषकातील वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारत-पाकिस्तान कधी भिडणार

HDFC बँक मजबूत अवस्थेत

दुसरीकडे HDFC बँकेचा शेअर तेजीत असल्याचं पाहायला मिळालंय. HDFC बँकेचा शेअर 3 टक्के फायद्यात असल्याची नोंद सकाळी करण्यात आली आहे. त्यामुळे आरबीआयने HDFC बँकेला पुन्हा नवे क्रेडीट कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे. त्याचाच परिणाम शेअर बाजारात HDFC बँकेचा शेअर सुधारल्याचं दिसून आलंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!