दहा कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत एलआयसी आयपीओ नेण्यासाठी ‘स्पाइस मनी’ व ‘रेलिगेअर ब्रोकिंग’ यांच्यात भागीदारी…

ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांसाठी मार्ग मोकळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : ग्रामीण भागातील नागरिकांना ‘एलआयसी आयपीओ’साठी अर्ज करण्याची सुविधा प्राप्त व्हावी, याकरीता ‘स्पाइस मनी’ या भारतातील बॅंकिंग क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या अग्रगण्य ग्रामीण फिनटेक कंपनीने ‘रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड’ (आयबीएल) या कंपनीशी भागीदारी केली आहे. ही एकमेवाद्वितीय अशी गुंतवणुकीची संधी असल्याने आपण हा पुढाकार घेतला असल्याचे ‘स्पाइस मनी’तर्फे आज सांगण्यात आले.
हेही वाचाःसरासरी ५९ टक्के मतदारांनी नाकारलेले उमेदवार बनले आमदार…

ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांसाठी मार्ग मोकळा

या सहयोगाच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना गुंतवणुकीच्या संधींमध्ये समान हिस्सा मिळावा आणि अशा प्रकारे, ग्रामीण-शहरी भेद दूर करण्यासाठी आणि आर्थिक समावेशनात वाढ करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले जावे, असे ‘रेलिगेअर ब्रोकिंग’ व ‘स्पाइस मनी’ यांचे समान उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण पिन कोड क्षेत्रांतील ९५ टक्के भागांमधील नागरिकांना भविष्यकाळात इक्विटी, म्युच्युअल फंड, कमोडिटी, करन्सी आणि एनपीएस या साधनांमध्ये गुंतवणूक करता यावी, संपत्ती निर्माण करता यावी, याकरीता ‘फिजिटल प्लॅटफॉर्म्स’च्या माध्यमातून भांडवली बाजारातील संधी उपलब्ध करण्यावर या भागीदारीतून प्रयत्न करण्यात येणार आहेत. ही व्यावसायिक भागीदारी आर्थिक बाजारात नव्याने शिरकाव करणाऱ्या ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक समावेशनाचा आणि आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करेल.
हेही वाचाःसुकूर पर्वरी येथे ऑईलने भरलेल्या कंटेनरचा अपघात…

‘रेलिगेअर ब्रोकिंग’ आणि ‘स्पाइस मनी’ यांच्यात ही भागीदारी

‘रेलिगेअर ब्रोकिंग’ ही कंपनी सध्या देशातील चारशेहून अधिक शहरांमध्ये अकराशेहून अधिक शाखा आणि व्यावसायिक भागीदारांच्या देशव्यापी नेटवर्कद्वारे १० लाखांहून अधिक ग्राहकांना डीमॅट सेवा देत आहे. दुसरीकडे, ‘स्पाइस मनी’ ही १० लाखांहून अधिक व्यापाऱ्यांचे (ज्यांना स्पाइस मनी अधिकारी म्हणतात) विस्तृत नेटवर्क असणारी अग्रगण्य ग्रामीण फिनटेक कंपनी, भारतातील ७००हून अधिक जिल्ह्यांमधील व दुर्गम भागातील १० कोटी कुटुंबांना सेवा देत आहे. या ग्रामीण भारताला भांडवली बाजारात थेट प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘रेलिगेअर ब्रोकिंग’ आणि ‘स्पाइस मनी’ यांच्यातील ही भागीदारी सहाय्यभूत ठरणार आहे.
हेही वाचाःगोवेकरांना नोकर्‍यांत प्राधान्य…

नवीन युगातील तंत्रज्ञान कंपन्यांनी आघाडी घेतली

सन २०२१ हे वर्ष दोन दशकांतील “सर्वोत्तम आयपीओ वर्ष” ठरले असल्याची नोंद भारताच्या आर्थिक इतिहासात झाली आहे. यामध्ये नवीन युगातील तंत्रज्ञान कंपन्यांनी आघाडी घेतली होती, तथापि पुरेसी जागरुकता, संधी आणि मदत यांच्या अभावामुळे देशाच्या ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांची टक्केवारी या आयपीओंमध्ये अत्यंत कमी आहे. या पार्श्वभूमीवर, ‘एलआयसी’च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या, पण ती कोठे करायचे हे माहीत नसलेल्या ग्रामीण नागरिकांना मदत करण्यासाठी, स्पाइस मनीचा सर्वाधिक समावेशक आणि विश्वासार्ह समुदाय, ज्यांच्याकडे आदरणीय बँकिंग प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते ते १० लाख अधिकारी, संपर्कबिंदू म्हणून काम करेल. या नागरिकांना डीमॅट खाते उघडण्यासाठी आणि ‘एलआयसी आयपीओ’साठी अर्ज करण्यास आणि भविष्यात इतर उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्यास ‘स्पाइस मनी अधिकारी’ मदत करतील.
हेही वाचाःगोवा विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…

देशातील सर्वात मोठा आयपीओ

‘स्पाइस मनी’चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार म्हणाले, “देशातील सर्वात मोठा आयपीओ भारताच्या दुर्गम भागात नेण्यासाठी ‘रेलिगेअर ब्रोकिंग’सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘स्पाइस मनी’मध्ये आम्ही देशासाठी आर्थिक समावेशकता वाढवण्याच्या मोहिमेवर असतो. आमची ही भागीदारी आमच्या ‘मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म’द्वारे ग्रामीण नागरिकांना मेगा आयपीओ आणि भविष्यातील इतर भांडवली बाजाराशी संबंधित उत्पादनांमध्ये सहभागी होण्याची संधी देईल. ‘एलआयसी’सारख्या देशव्यापी, विश्वासार्ह ब्रँडच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करताना ग्रामीण नागरिकांना गुंतवणुकीच्या अशा संधींविषयी माहिती मिळू शकेल, ज्यांबद्दल ते सध्या अनभिज्ञ आहेत.”
हेही वाचाः‘दिल्ली कॅपिटल्सचा कोलकातावर ४ गडी राखून विजय…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!