झोमॅटोच्या शेअरचं अलॉटमेन्ट झालं! उद्या भांडवली बाजारात होणार एन्ट्री?

शेअर बाजारातून मोठी बातमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : आपल्या होम डिलिव्हरी सर्व्हिसने सगळ्यांच्या आकर्षित केलेली झोमॅटो कंपनी शेअर बाजारत उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. झोमॅटोचा आयपीओही फारच चर्चेत आला होता. अखेर झोमॅटो कंपनी आपल्या नियोजित वेळेआधीच बाजारात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आज झोमॅटोच्या शेअरची वाटप प्रक्रिया म्हणजेच अलॉटमेन्ट करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. मनी कंट्रोलने याबाबतचं वृत्त दिलंय. त्यामुळे उद्या म्हणजेच २३ जुलैला भांडवली बाजारत झोमॅटो एन्ट्री करेल, असं बोललं जातंय.

ठरलं तर!

सेबीने परवानगी दिल्यानंतर तातडीने समभाग विक्री योजनेची घोषणा करणाऱ्या झोमॅटोकडून नियोजित वेळेपूर्वीच भांडवली बाजारात एंट्री घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.दरम्यान, झोमॅटोची नोंदणी २६ किंवा २७ जुलै रोजी होण्याची शक्यता होती. मात्र कंपनी २३ जुलै रोजी भांडवली बाजारात एंट्री घेतली जाईल, असं सांगितलं जातंय.

बाजारात येण्याआधीच दबदबा

आयपीओमधून झोमॅटोने तब्बल ९ हजार ३७५ कोटी उभारले आहेत. समभाग विक्रीला गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालंय. झोमॅटोचा आयपीओ सरासरी ४०.३८ पटीने सबस्क्राईब झाला होता. जवळपास २.१३ लाख कोटींचे प्रस्ताव कंपनीजवळ आल्याची माहिती समोर आली होती. गेल्या ११ वर्षात तिसऱ्यांदा एखाद्या कंपनीच्या आयपीओला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय. या इश्यूसाठी कंपनीने एका शेअरसाठी ७२ ते ७६ रुपये किंमत निश्चित केली होती.

share 800X450
share 800X450

हेही वाचा : देशाची तिजोरी भरली, परकीय चलन साठा 611 अब्ज डॉलर्सच्या पुढे

दरम्यान, आयपीओमध्ये कोणाला शेअर मिळाले याचे वाटप आज झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय. कंपनीकडून शेअर अलॉटमेंटची प्रक्रिया २२ जुलैला केली जाऊ शकते, असं आधी सांगितलं जात होतं. त्याप्रमाणे ही प्रक्रिया झाल्याचं वृत्त मनीकंट्रोल या वेबसाईटने दिलं आहे. आयपीओ जाहीर होण्यापूर्वी कंपनीच्या बाजार मूल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाला नाही. किरकोळ आणि अँकर गुंतवणूकदारांनी या इश्यूला भरभरून प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालंय.

हेही वाचा : वाढलेल्या डीएमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, हे जाणून घ्या

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!