एसबीआय लाइफ इन्शुरन्सच्या सिंगल प्रीमियमध्ये ४२ टक्के वाढ

31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या कालावधीत 14,437 कोटी रुपयांच्या न्यू बिझनेस प्रीमियमची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्लीः एसबीआय लाइफ इन्शुरन्सतर्फे 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या कालावधीत 14,437 कोटी रुपयांच्या न्यू बिझनेस प्रीमियमची नोंदणी केली असून गेल्या वर्षी म्हणजेच 31 डिसेंबर 2019 रोजी संपलेल्या कालावधीत ही रक्कम 12,787 कोटी रुपये होती. सिंगल प्रीमियममधेही गेल्या वर्षाच्या तुलनेत 42 टक्के वाढ झाली आहे.

इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमियम

संरक्षणावर जास्त भर देत एसबीआय लाइफचा प्रोटेक्शन न्यू बिझनेस प्रीमियम 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या कालावधीत 1618 कोटी रुपयांवर गेला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात 12 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. प्रोटेक्शन इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमिमयमधे 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या कालावधीत 36 टकक्यांची वाढ होऊन तो 488 कोटी रुपयांवर गेला आहे. इंडिव्हिज्युअल न्यू बिझनेस प्रीमियम आता 8128 कोटी रुपयांवर गेला आहे.

करोत्तर नफा

एसबीआय लाइफचा करोत्तर नफा 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या कालावधीत गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढून 923 कोटी रुपयांवर गेला आहे.

सॉल्व्हन्सी गुणोत्तर

कंपनीचे सॉल्व्हन्सी गुणोत्तर 31 डिसेंबर 2020 रोजी दमदार म्हणजेच 2.34 राहिले असून नियामक तत्वांनुसार ते केवळ 1.50 असणे आवश्यक आहे.

एयूएम आणि डेट-इक्विटी

एसबीआय लाइफचे एयूएम 31 डिसेंबर 2019 रोजी असलेल्या 1,64,191 कोटी रुपयांवरून 28 टकक्यांनी वाढून 31 डिसेंबर 2020 रोजी 2,09,495 कोटी रुपयांवर गेले आहे, तर डेट- इक्विटी मिक्स 73:27 आहे. 90 टक्के डेट गुंतवणूक एएए आणि सॉर्व्हिजन साधनांमधे करण्यात आली आहे.

कंपनीच्या वैविध्यपूर्ण वितरण नेटवर्कमधे 2,24,223 प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचा समावेश असून 947 शाखांद्वारे कंपनीचे अस्तित्व देशभरात विस्तारलेले आहे. त्यामधे बँकान्शुरन्स चॅनेल, एजन्सी चॅनेल आणि इतरांमधे कॉर्पोरेट एंज्टस, कॉमन सर्व्हिस सेंटर्स, विमा विपणन संस्था, वेब अग्रीगेटर्स आणि थेट व्यवसायाचा समावेश आहे.

31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या कालावधीतील कामगिरी –

• न्यू बिझनेस मार्जिनमधे 100 बीपीएसची वाढ होऊन 19.3 टक्क्यांवर
• असेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) 2.0 ट्रिलियन रुपयांपुढे
• 23.7 टक्के बाजारपेठ हिश्श्यासह एनबीपीमधे खासगी बाजारपेठेत आघाडी
• 23.4 टक्के बाजारपेठ हिश्श्यासह इंडिव्हिज्युअल रेटेड प्रीमियममधे (आयआरपी) खासगी बाजारपेठेत आघाडी
• रिन्यूवल प्रीमियममधे 27 टक्क्यांची वाढ, 13 महिन्यांच्या सलगतेसह 86.17 टक्के
• ऑपरेटिंग एक्सपेन्स गुणोत्तर 6.0 टक्क्यांवरून कमी होऊन 5.1 टक्क्यांवर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!