10 वर्षाच्या मुलांच्या नावावर दररोज 15 रुपये जमा करुन 28 लाख मिळवण्याची संधी

पीपीएफ योजनेत किती पैसे गुंतवायचे? वाचा याबद्दल सविस्तर

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: लहान मुलांच्या भविष्याबद्दल अनेक पालक गांभीर्यानं विचार करत असतात. मुलांचं शिक्षण, नोकरी, लग्न अशा गोष्टींचा विचार पालकांकडून केला जात असतो. काही पालक त्यांचा मुलगा आणि मुलगी लहान असतानाचं त्यांच्या नावानं गुंतवणुकीला सुरुवात करतात. पालकांनी केलेल्या या गुंतवणुकीचा फायदा मुलांना होतो. पब्लिक प्रॉविडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही एक चांगली योजना आहे. मुलांच्या नावानं गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली संधी आहे. पीपीएफ खाते काढल्यानंतर त्यामध्ये नियमितपणे रक्कम जमा करणं आवश्यक असून त्यानंतरचं योजनेचे फायदे मिळू शकतात.

हेही वाचाः ACCIDENT | शिवोली पुलावर जीपच्या धडकेत दोन गुरं ठार

पीपीएफ योजनेत किती पैसे गुंतवायचे?

पीपीएफ योजनेत पैसे कसे गुंतवायचे हे आपण एका उदाहरणानुसार समजून घेऊ. समजा तु्ही तुमच्या 10 वर्षाच्या मुलीच्या नावानं पीपीएफ अकाऊंट काढलं आणि दरमहा 500 रुपये म्हणजेच दररोज 15 ते 17 रुपये बचत करुन गुंतवणूक करता येईल. पीपीएफ खात्यात मुलीच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत गुंतवणूक सुरु ठेवता येईल. 7 टक्के व्याजासह त्यावेळी 27 लाख 86 हजार 658 रुपये मिळतील.

हेही वाचाः ACCIDENT | अज्ञात वाहनाने ठोकरल्याने युवकाचा मृत्यू

22 व्या वर्षी पीपीएफ खाते काढल्यास

समजा मुलीनं 22 व्या वर्षी नोकरी सुरु केली आणि तिनं तिच्याकडून पीपीएफ खात्यात रक्कम टाकण्यास सुरुवात केली. मुलीनं दरमहा 1 हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केल्यास. पुढील 38 वर्षे दरमहा गुंतवणूक सुरू ठेवल्यास, 7 टक्के व्याजाच्या हिशोबानं तिला 23 लाख 72 हजार 635 रुपये मिळतील.

हेही वाचाः वास्कोत डेंग्यूमुळे नागरिकांत भीतीचं वातावरण

लगेच पीपीएफ खाते उघडा

अधिक परतावा हवा असेल तर पीपीएफ खाते लवकर काढावं असा सल्ला दिला जातो. आई-वडील त्यांच्या एकाच मुलाच्या नावावर पीपीएफ खाते काढू शकतात. खातं उघडण्यासाठी मुलीचे आई-वडील भारतीय नागरीक असणं आवश्यक आहे. यासाठी केवायसी देखील अपडेट करावी लागते. आई वडिलांचा मुलीसह असणारा फोटो अपलोड करावा लागतो. पीपीएफ अकाऊंट सुरू करताना सुरुवातीचे हप्ते चेकद्वारे भरावे लागतात.

हेही वाचाः सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृहकर्ज योजना; सरकारी आदेशाला खंडपीठात आव्हान

कर बचतीचा फायदा

पालक मुलांच्या नावानं काढलेल्या पीपीएफ अकाऊंटमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. पीपीएफमधील गुंतवणुकीद्वारे कर बचत देखील करता येते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!