बँकेत पैसे भरायची, काढायची सोयच राहिली नाही, त्यावरही शुल्क लागणार! वाचा नवा नियम

अनेकांनी या नियमावर नाराजी व्यक्त केली आहे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : 1 नोव्हेंबरपबासून अनेक नियम बदलणार आहेत. बँकेसंबंधीच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. हा नियम नोव्हेंबरपासून लागू असणार आहे.या नियमांमुळे भविष्यात बँकेत पैसे भरताना आणि काढतानाही शुल्क लागणार असल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेमके काय आहे हे नियम, त्यावर एक नजर टाकुयात….

– मर्यादितेपेक्षा जास्त बँकिंग सेवेचा वापर केल्यास फी भरावी लागणार आहे.
– ग्राहकांना लोन अकाऊंटमधून महिन्यात 3 वेळा पैसे काढता येणार आहे.
– तीनपेक्षा जास्त वेळा पैसे विड्रॉ केल्यास तब्बल 150 रुपये शुल्क आकारलं जाणर आहे.
– सेविंग अकाऊंटमध्येही फक्त तीनवेळा पैसै डिपॉझिट करता येणार
– त्यापेक्षा जास्त वेळा डिपॉझिट करायचे असल्यास 40 रुपये शुल्क आकारलं जाणार
– 1 नोव्हेंबरपासून हे नियम लागू केले जाणार आहेत.
– त्याच वेळी जन धन खातेदारांना यातून थोडा दिलासा मिळाला आहे, त्यांना जमा करण्यात येणाऱ्या

– रकमेवर कोणतीही फी भरावी लागणार नाही, परंतु पैसे काढताना 100 रुपये द्यावे लागतील.

गॅसची किंमत वाढणार?

तर दुसरीकडे गँसच्या किंमतींही बदलणार आहेत. इतकंच नाही तर गॅस डिलिव्हरीवेळी ओटीपी नंबर द्यावा लागणार आहेत. हा नंबर प्रत्येक कस्टमरच्या मोबाईल नंबरशी जोडलेला असणार आहे. सध्या मोबाईलवरुनच गॅस बुकींग करावं लागतं. मात्र आता गॅस डिलिव्हरीवेळी बुकिंग केलेल्या गॅसचा ओटीपी नंबर डिलिव्हरी बॉयला देणं बंधनकारक असणार आहे. 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

रेल्वे वेळापत्रकातही बदल

तर दुसरा महत्त्वाचा बदल करण्यात आलाय, तो रेल्वेच्या वेळापत्रकाबाबत… १ तारखेपासून रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यानंतर 13 हजार प्रवासी गाड्यांच्या वेळा बदलतील. 1 नोव्हेंबरपासून देशात चालणार्‍या जवळपास 30 राजधानी गाड्यांची वेळही बदलणार आहे.

हेही वाचा –

सुप्रीम कोर्टाकडून पोलिसांना कानपिचक्या

चुकीला माफी नाही! कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

मराठी,हिंदी,कोकणी भाषेचा वाद सोडा आणि या शिक्षकांकडून काहीतरी शिका

सत्तरीवाल्यांसाठी खुशखबर! सरकारी कार्यालयातील हेलपाटे होणार बंद

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!