‘गोदरेज लफेर’तर्फे #RespectAllBandhans

भावा- बहिणीच्या नात्याप्रमाणे सर्वांसाठी प्रेम, सन्मान आणि काळजी असावी असा संदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः रक्षा बंधनाच्या निमित्ताने गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडने गोदरेज लफेर या आपल्या जीवनशैलीविषयक प्लॅटफॉर्मद्वारे एक डिजिटल फिल्म लाँच केली आहे, जी लोकांना प्रत्येक नात्याकडे प्रेम आणि आदरानं पाहाण्यासाठी प्रोत्साहन देते. गोदरेज कॉर्पोरेट ब्रँड आणि कॉर्पोरेट ब्रँड व कम्यनिकेशन्सच्या टीमने तयार केलेल्या या फिल्ममधून रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी भावा- बहिणीच्या नात्याप्रमाणे सर्वांसाठी प्रेम, सन्मान आणि काळजी असावी असा संदेश देण्यात आला आहे.

राखीचा पवित्र धागा संरक्षण आणि काळजीचे प्रतीक मानला जातो व तो कोणत्याही नात्यासाठी लागू होतो. त्यातून हे जग आणखी सुंदर व शांत बनवण्यास मदत होईल. #RespectAllBandhans द्वारे लोकांना जगातील प्रत्येकावर समान प्रेम करण्याचा आणि केवळ भाऊ- बहिणीच्या नात्यापुरतं मर्यादित न ठेवण्याचा संदेश देण्यात येत आहे.

या व्हिडिओमध्ये इनफ्लुएन्सर सिमॉन खंबाटा, सलील आचार्य आणि शशांक सांघवी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने रोज सर्वांवर प्रेम करण्याचा संदेश दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!