कामाची बातमी! NEFT या दिवशी करणं टाळा, कारण…

आरबीआयनं ट्वीट करुन दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोना महामारीमध्ये बँकांच्या कामकाजाच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत. बहुतांश व्यवहार ऑनलाईन होत आहेत. अशातच व्यावसायिक आणि बँकेबाबत एक महत्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं NEFT सेवेबाबत ट्वीट केलंय. ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा 23 मे रोजी 14 तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती आरबीआयनं दिली आहे.

एनईएफटीद्वारे आपण भारतातील कोणत्याही ठिकाणी बँकेच्या शाखेत न जाता पैसे पाठवू शकतो. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टीम (NEFT) संपूर्ण देशात वापरली जाते. या सेवेद्वारे पैसे पाठवण्यासाठी किमान किंवा कमाल मर्यादा नसते. दरम्यान, ही सेवा २३ मे रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याचं आरबीआयनं म्हटलंय.

किती वेळ बंद?

RBI ने त्यांच्या Twitter हँडलवरुन ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 22 मे रोजी बँकांचं कामकाज संपल्यानंतर टेक्निकल अपग्रेडेशनसाठी NEFT 23 मे रोजी 00:01 ते दुपारी 14:00 म्हणजेत (रात्रीच्या 12वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत) बंद राहिल. दुसरीकडे RTGS सेवा सुरु राहणार आहे.

NEFT सेवा नेमकी काय?

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर सिस्टम ही अशी सुविधा आहे जी तुम्हाला तुमच्या बँकेच्या मोबाईल अ‌ॅपवर वापरता येते. या सुविधेद्वारे काही मिनिंटांमध्ये पैसे पाठवले जातात. एनईएफटी ही सरळ आणि सोपी, सुरक्षित सुविधा आहे. ही सेवा वापरल्यानंतर ईमेल आणि एसएमएस ग्राहकांना प्राप्त होतो. इंटरनेट बँकिगद्वारे ही सुविधा कधीही वापरता येते. एनईएफटीद्वारे दोन्ही व्यक्तींना एकाच ठिकाणी उपस्थित राहण्याती गरज नाही. या सुविधेद्वारे करण्यात आलेल्या व्यवहाराची माहिती पैसे पाठवणाऱ्याला आणि पैसे स्वीकारणाऱ्याला देखील मिळते.

NEFT द्वारे पैसे कसे ट्रान्सफर करायचे?

लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे तुमचं ऑनलाईन बैंकिंग अकाउँट ओपन करा. NEFT Fund Transfer सेक्शनमध्ये जावा. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या डिटेल्स अ‌ॅड करा. त्यानंतर त्याचं नाव, बँक अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोड टाका. ज्याला पैसे पाठवणार आहोत त्याची माहिती सेव झाली की तुम्ही पैसे पाठवू शकता. तुम्हाला जितकी रक्कम पाठवायची आहे ती टाका आणि पैसे पाठवा. बँका NEFT शिवाय IMPS आणि RTGS सेवा देतात. या दोन्ही सेवा २३ मे रोजी सुरु राहणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!