रिलायन्सतर्फे मुंबईत ‘जिओ वर्ल्ड ड्राइव्ह’चे लाँच जाहीर

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील पहिले प्रीमियम रिटेल डेस्टिनेशन

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः रिलायन्सने आपल्या प्रीमियम रिटेल डेस्टिनेशनचे – जिओ वर्ल्ड ड्राइव्ह (जेडब्ल्यूडी) मुंबईतील व्यावसायिक केंद्र, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे अनावरण केले आहे.

मेकर मॅक्सिटी येथे 17.5 एकरांत आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे धोरणात्मक पद्धतीने वसलेले जिओ वर्ल्ड ड्राइव्ह हे मुंबईतील सर्वात नवे, आकर्षक, धमाल अनुभव देणारे शहरी ठिकाण आहे. या ठिकाणी 72 प्रमुख आंतरराष्ट्रीय व भारतीय ब्रँड्स, जगभरातील खाद्यपदार्थांची 27 दालने, मुंबईतील पहिले रूफटॉप जिओ ड्राइव्ह- इन थिएटर, ओपन- एयर वीकेंड कम्युनिटी मार्केट, पाळीव प्राण्यांचेही स्वागत करणारी सेवा, खास पॉप-अप अनुभव आणि गरजेनुसार सेवा यांचा अनुभव घेता येणार आहे.

अभिजात, तरंगता दर्शनी भाग रिटेल आर्किटेक्टरचा सर्वोत्कृष्ट नमुना

जगप्रसिद्ध डिझाइन आर्किटेक्ट्स रॉस बॉनथोर्न आणि अँडी लॅम्पार्ड यांनी डिझाइन केलेला जिओ वर्ल्ड ड्राइव्हचा अभिजात, तरंगता दर्शनी भाग रिटेल आर्किटेक्टरचा सर्वोत्कृष्ट नमुना असून फ्रेंच संकल्पना ‘नूआज’पासून प्रेरणा घेत एखाद्या ढगाप्रमाणे त्याची रचना करण्यात आली आहे. हा परिसर मंद आकाश दिव्यांच्या मदतीने खुला हवेशीरपणा तयार करत हाय- स्ट्रीटचा अनुभव देतो. याचे डिझाइन बाह्य आणि अंतर्गत भाग एकत्र करण्याच्या संकल्पनेवर आधारित असून संपूर्ण परिसरातील कलेचे नमुने जणू कलादालनातून बाहेर पडत असल्याची भावना तयार करतात व प्रेक्षकाचे दैनंदिन अनुभवातून अभिवादन करतात.

या परिसरामध्ये भारताच्या व्यावसायिक क्षेत्रातील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सार्वजनिक कलेचा सर्वात वैविध्यपूर्ण संग्रह मांडण्यात आला आहे. अत्याधुनिक कलेचे हे नमुने प्रसिद्ध कलाकारांनी तयार केले असून ते ग्राहकांना आपल्या सर्जनशील आणि कलात्मक अभिव्यक्तीतून मुंबईचे स्पिरीट, तिचे विविध पैलू आणि वैशिष्ट्यांची आठवण करून देतील.

‘खास पॉप अप स्पेस’च्या जागतिक संकल्पनेची ओळख

रिटेल क्षेत्रातील नाविन्यतेचा आकर्षक संकल्पनांशी मेळ घालणारा हा परिसर भारतात पहिल्यांदाच ‘खास पॉप अप स्पेस’च्या जागतिक संकल्पनेची ओळख करून देईल. पॉप अप @ द व्हाईट क्रो ही अनोखी, कस्टमायझेबल संकल्पना आहे, जी ग्राहक तसेच ब्रँड्सना अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. आतापर्यंत कधी न पाहिलेले फॅशनवेयर्स, जीवनशैलीविषयक, अक्सेसरीज ब्रँड्स प्रकाशझोतात येतील आणि दर तीन महिन्यांनी अद्ययावत होत राहतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!